शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:13 IST

आता रडायचे नाही, तर आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे हे ब्रिद घेऊन देवाडा खुर्द येथील कष्टकरी, निराधार व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी देवाडा खुर्दवासीयांचा कुटुंबासह बैल -बंडी, गुरे ढोरे घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.

ठळक मुद्देपोंभुर्ण्यात धडकला मोर्चा : तालुका निर्मितीनंतर नागरिकांची ऐतिहासिक उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कपोभूर्णा : आता रडायचे नाही, तर आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे हे ब्रिद घेऊन देवाडा खुर्द येथील कष्टकरी, निराधार व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी देवाडा खुर्दवासीयांचा कुटुंबासह बैल -बंडी, गुरे ढोरे घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.डॉ. आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात देवाडा खुर्द येथील नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. पोंभूर्णा तालुक्यातील सर्वात मोठे महसुली गाव म्हणून देवाडा खुर्द गावाचा विचार होतो. मात्र हे गाव शासकीय सोयी सवलती, योजना व विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप गांवकऱ्यांनी केला आहे.मौजा रामपूर दीक्षित, कोसंबी रिठ येथील सार्वजनिक प्रयोजनार्थ ठेवलेली जागा महसूल अधिकाºयांनी चिरीमिरी घेऊन पट्टे स्वरुपात दिली. हे पट्टे त्वरित रद्द करून ती जमीन शासन जमा करण्यात यावी, बोगस व धनदांडग्या अतिक्रमणधारकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, गावाच्या निस्तार हक्काची जागा गोठविणारे तत्कालीन उपविभागिय अधिकारी चंद्रभान पराते यांची मालमत्ता व आर्थिक परिस्थितीची चौकशी करण्यात यावी, महसुली अभिलेखात खोडतोड करून नव्याने अभिलेखात नोंद करणाऱ्या अभिलेख प्रमुखावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, गावातील गुरे-ढोरे चराईच्या जमिनीवर अतिक्रमण करून वन संपदा नष्ट करणाऱ्या महसुली अधिकाºयावर कार्यवाही करण्यात यावी, चालु आर्थिक वर्षात अंधारी नदीवर बंधारा बांधून सिंचनाची समस्या तात्काळ मार्गी लावावी यासह अनेक शेतकरी हिताच्या मागण्या यावेळी मोर्चेकरांनी लावून धरण्यात आल्या.यावेळी बल्लारपूरचे जेष्ट सामाजिक कार्यकर्ते पवन भगत, पोंभूर्णा तालुका कॉंग्रेस कमिटीचे ओमेश्वर पद्मगिरीवार, युवा सेनेचे उप जिल्हा प्रमुख आशिष कावटवार, पोंभूर्णा शिवसेना नेते गणेश वासलवार, देवाडा खुर्दचे सरपंच विलास मोगरकार, राजू झोडे, निलकंठ नैताम यांनी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात महिला, पुरूष, बेरोजगारांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.तहसीलदारांच्या अनुपस्थितीमुळे तणावशेतकºयांची पाळीव जनावरे, बैल-बंड्या व महिलांच्या लाक्षणिक उपस्थितीमुळे या मोर्चाने पोंभूर्ण्यातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तहसील कार्यालयात तहसीलदार उपस्थित नव्हते. मात्र मोर्चेकरांनी तहसीलदारांचीच भेट घेण्याचा हट्ट धरल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे कोणताच अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :Morchaमोर्चाTahasildarतहसीलदार