शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हातापायाला २४ बोटांचे अर्भक रस्त्याच्या कडेला आढळले; भद्रावतीतील घटना, एकच खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2022 10:27 IST

अंधश्रद्धेतून प्रकार घडल्याबाबत शंकाकुशंका

भद्रावती (चंद्रपूर) : शहरातील जैन मंदिर परिसराच्या मागील बाजूस चंडिका माता परिसरात एक दिवसाचे नवजात अर्भक कडेला ठेवल्याचे आढळून आले. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे हा नवजात शिशू मुलगा असून त्याच्या हाताला १२ आणि पायाला १२ असे एकूण २४ बोटे आहेत. अंधश्रद्धेतून त्याला रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आल्याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. पोलिसांनी त्या दिशने तपास चालवला आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी त्या नवजात अर्भकाला ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्या मातेचा शोध सुरू केला आहे. शहरातील चंडिका माता परिसरातील गॅरेज मालक देवानंद हिवरकर यांना सकाळी ७ वाजताच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी त्या दिशेने जाऊन बघितले असता कापडात जिवंत नवजात शिशू असल्याचे दिसून आले. दरम्यान, नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली.

याबाबत डॉ. नरेश कोठे यांनी भद्रावती पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस उपनिरीक्षक अमोल कोल्हे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपानी हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता नवजात शिशूच्या अंगाला मुंग्या लागल्या होत्या. त्यानंतर भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला दूध पाजण्यात आले. जिवंत अर्भकाला या स्थितीत सोडणारी ती निर्दयी माता कोण, याचा शोध घेण्यासाठी रुग्णालय तसेच परिसरातील माहिती गोळा करणे सुरू केले आहे.

घटनास्थळावर नागरिकांची गर्दी

चंडिका माता परिसरातील गॅरेज मालक देवानंद हिवरकर यांना सकाळी ७ च्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी त्या दिशेने जाऊन बघितले असता कापडात जिवंत नवजात शिशू असल्याचे दिसून आले. दरम्यान, नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली. याबाबत डॉ. नरेश कोठे यांनी भद्रावती पोलिसांना माहिती दिली.

टॅग्स :new born babyनवजात अर्भकCrime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर