शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अमृत पाणी पुरवठा योजना २३५ कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:25 IST

केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणी पुरवठा प्रकल्पाचा सुधारित आराखडा जाहीर करण्यात आला असून राज्य शासनाने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. नव्या आराखड्यानुसार ही योजना आता तब्बल २३४ कोटी ९५ लाख १७ हजार ७३५ रुपयांची झाली आहे. केंद्र शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या ५० टक्के म्हणजे ११७ कोटी ४७ लाखांचा निधी महानगरपालिकेला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देसुधारित आराखडा जाहीर : केंद्र सरकार देणार ११७ कोटी रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणी पुरवठा प्रकल्पाचा सुधारित आराखडा जाहीर करण्यात आला असून राज्य शासनाने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. नव्या आराखड्यानुसार ही योजना आता तब्बल २३४ कोटी ९५ लाख १७ हजार ७३५ रुपयांची झाली आहे. केंद्र शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या ५० टक्के म्हणजे ११७ कोटी ४७ लाखांचा निधी महानगरपालिकेला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.चंद्रपूर शहरातील सर्वच वॉर्डांमध्ये अमृत पाणी पुरवठा योजनेकरिता पाईपलाईन टाकण्याच्या हेतूने अंतर्गत रस्ते खोदण्यात आले आहेत. पण, या रस्त्यांची योग्यरित्या डागडुजी झाली नाही. परिणामी केंद्र शासन पुरस्कृत ही महत्त्वाकांक्षी योजना सत्ताधारी व विरोधी नगर सेवकांमध्येही टिकेचा विषय ठरली आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने १३ आॅक्टोबर २०१५ रोजी अमृत अभियानाकरिता आदेश जाहीर केला होता. त्यानंतर राज्यस्तरीय तांत्रिक समिती गठित करून मार्गदर्शकतत्वे तयार केली होती. दरम्यान, या विभागाने १६ मे २०१६ व १२ जुलै २०१६ ला केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बांधकामाला सुरूवात केली. २०१६-२०१७ च्या आर्थिक वर्षात या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र चंद्रपुरातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उपांगामुळे अनेक बदल करण्यात आले होते. या बदलाला प्रशासकीय मान्यता मिळाली नव्हती. यामुळे सुरु असलेली पायाभूत कामे कामे प्रभावित झाली. नगर विभागाच्या सहसचिव पां. ज. जाधव यांनी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर शहराच्या सुधारीत पाणी पुरवठा सुधारित आकृतीबंधाला शुक्रवारी मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाकडून मंजूर राज्य वार्षिक कृती आराखड्यानुसार केंद्र सरकारकडून मनपाला ११७ कोटी ४५ लाखांचा निधी मिळणार आहे.राज्यशासन व मनपाचा समान सहभागअमृत पाणी पुरवठा योजनेकरिता २३४ कोटी ९५ लाखांचा निधी खर्च होणार आहे. केंद्र सरकारने ५० टक्के वाटा उचलला तर राज्य शासन व मनपाला प्रत्येकी २५ टक्के प्रकल्प सहभाग देऊन ही योजना पूर्ण करायची आहे. सद्यस्थितीत पाईपलाईन टाकण्याचे काम शहरात जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.योजनेचे काम रेंगाळणारअमृत पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने कार्यादेश जाहीर केल्यापासून दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले होत. परंतु मनपासमोर उभ्या ठाकलेल्या विविध आव्हानांमुळे या अमृत योजनेची कामे पुन्हा रेंगाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.