शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

चंद्रपुरात ट्रकभरुन दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

एका आयशर ट्रकमधून मोठा दारूसाठा चंद्रपुरात येत असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे रामनगर डीबी पथकाने सापळा रचून नाकाबंदी केली. पोलिसांना बघून वाहनचालकाने वाहन पळविले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून चंद्रपूर-मूल मार्गावरील होंडा शोरूम जवळ ट्रक थांबवून झडती घेतली.

ठळक मुद्देरामनगर पोलिसांची कारवाई : ३१ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एका आयशर ट्रकमधून तब्बल १६० पेट्या दारु शनिवारी रामनगर पोलिसांनी जप्त करुन एकाला अटक केली. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐवढी मोठी दारु जप्त केल्याने विविध चर्चेला पेव फुटले आहे.एका आयशर ट्रकमधून मोठा दारूसाठा चंद्रपुरात येत असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे रामनगर डीबी पथकाने सापळा रचून नाकाबंदी केली. पोलिसांना बघून वाहनचालकाने वाहन पळविले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून चंद्रपूर-मूल मार्गावरील होंडा शोरूम जवळ ट्रक थांबवून झडती घेतली. या ट्रकमध्ये देशीदारूच्या १६० पेट्या आढळून आल्या. यावेळी वाहनचालकांना अटक करण्यात आली. सदर कारवाई डीबी पथकाचे एपीआय दरेकर, एएसआय माऊलीकर, जाधव, राकेश निमगडे, कामडी, माजिद पठाण आदींने केली.आठवडाभरात सावलीत स्थानिक गुन्हे शाखेची दुसरी धडक कारवाईसावली : स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने रविवारी सावली येथे कारवाई करुन १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन तिघांना अटक केली. श्रीनिवास पुल्लुरवार ४५, रविंद्र ठाकूर २७, पुरुषोत्तम दिवाकर बावणे २५, तिघेही रा. लोंढोली असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. आठवडाभरात स्थानिक गुन्हे शाखेने सावली येथे दोन मोठ-मोठ्या कारवाई करुन मोठ्या प्रमाणात दारुसाठा जप्त केला आहे. सततच्या कारवाईने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. रविवारच्या पहाटे सुमारे २ ते ३ वाजताच्या दरम्यान सावली हरांबा मार्गावर सापळा रचून टाटा एस क्र. एमएच ३४ एबी ४८३१ या वाहनातून १०९ पेटी देशी दारू व पाच पेटी विदेशी दारू आणि तीन भ्रमणध्वनी संच असा एकूण १४ लाख ६५ हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन तिघांना अटक केली. तीन दिवसांपूर्वीही मतपाल गोमस्कार रा. सावली यांच्या घरातून तीन लाख रुपये किंमतीची २६ पेट्या देशी दारू पकडली होती. गोमस्कारला न्यायालयीन कोठडी तर श्रीनिवास पुल्लुरवार व इतर दोन आरोपींना १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सावलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडलिक म्हस्के करीत आहेत. श्रीनिवास पुल्लुरवार यांच्यावर सहा महिन्यापूर्वी तडिपारची कार्यवाही करण्यात आली हे विशेष.नागपूरचा पोलीस निघाला दारुतस्करमूल : दारूची वाहतूक करताना पोलीस मुख्यालयात तैनात पोलीस शिपायासह पाच जणांना मूल पोलिसांनी अटक करुन दोन कार आणि मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात आला. पोलीस मुख्यालयात सेवारत असलेले परवेज इशाद बाळापुरे (३२) रा. धरमपेठ यांच्यासह भूषण अशोक भरे (२६) देशपांडे लेआऊट, प्रकाश प्रमोद रंगारी (२४), विजय बाबूराव तायवाडे (२९), हर्षल विनोद मोटघरे (२८) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. नागपुरातील काही जण मूलमार्गे चंद्रपूर येथे दारुची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारावर मूल पोलिसांनी चामोर्शी नाक्याजवळ सापळा रचून एम. एच. ४० एटी ८१७१ व एम. एच. ४० एटी ८१९९ या क्रमांकाच्या वाहनाला थांबवून झडती घेऊन साडे तीन लाखांची विदेशी दारू जप्त केली. घटनेची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालय नागपूर ग्रामीण पोलिसांना या घटनेचा अहवाल पाठविणार आहे. अटकेतील दारू तस्करांची सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सतिशसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मनोज गडादे व त्यांच्या चमूंनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी