शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

घुग्घुसच्या विकासासाठी सदैव वचनबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:17 IST

१९९५ मध्ये मी महाराष्ट्र विधानसभेत प्रथमच निवडून गेलो. माझ्या त्या विजयात घुग्घूसवासीयांच्या प्रेमाचा मोठा वाटा आहे. घुग्घूसच्या विकासासाठी मी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बसस्थानक व २७ कोटींच्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १९९५ मध्ये मी महाराष्ट्र विधानसभेत प्रथमच निवडून गेलो. माझ्या त्या विजयात घुग्घूसवासीयांच्या प्रेमाचा मोठा वाटा आहे. घुग्घूसच्या विकासासाठी मी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या वर्षी २५१५ या लेखा शिर्षांतर्गत दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून आठ कोटी रू. खर्चुन अत्याधुनिक बसस्थानक या शहरात बांधण्यात येत आहे. घुग्घूस येथील १० ओपन स्पेसच्या विकासासाठी पाच कोटीचा निधी आपण लवकरच मंजूर करणार असून घुग्घूस येथे सर्व सोयींनी युक्त स्टेडियमचे बांधकामसुध्दा करण्यात येणार आहे. घुग्घूस येथील नागरिकांनी आजवर माझ्यावर केलेल्या प्रेमाला मी कधीही उतराई होणार नाही. या शहराच्या विकासासाठी मी सदैव वचनबध्द असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर जिल्हयातील घुग्घूस येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळयानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, जिल्हा परिषद सदस्य रणजित सोयाम, नितु चौधरी, पंचायत समितीच्या सभापती वंदना पिंपळशेंडे, पंचायत समिती सदस्य निरिक्षण तांड्रा, घुग्घूसचे सरपंच संतोष नुने, चंद्रपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष नामदेव डाहुले, घुग्घूस भाजपाचे अध्यक्ष विवेक बोढे, माजी जि.प. सदस्य चिन्ना नलबोगा, चंद्रपूर मनपाचे स्थायी सभापती राहुल पावडे आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हयात विकासाचे अनेक प्रकल्प आम्ही आणले आहेत. चंद्रपूर येथील वनअकादमीची इमारत भारतात दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे. जिल्हयासाठी मेडीकल कॉलेज, सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, कॅन्सर हॉस्पीटल असे विविध प्रकल्प आपण राबवित आहोत. चिचपल्ली येथील बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्र नुकतेच सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहे. विकासाचे विविध टप्पे जिल्हयातील नागरिक अनुभवत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर म्हणाले, अर्थमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर ठरला आहे. अनेक प्रकल्प, उपक्रम त्यांनी जिल्हयात राबविले आहेत. रस्ते विकास, पाणी पुरवठा सर्वच क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वात जिल्हयात लक्षणीय कामगीरी सुरू आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातूनसुध्दा विविध विकास कामे या क्षेत्रात आम्ही केली आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी जि. प. अध्यक्ष भोंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अत्याधुनिक बसस्थानकाच्या बांधकामाचे व २७ कोटी रू खर्चुन बांधण्यात येणाºया घुग्घूस-वणी-यवतमाळ उंच पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.२७ कोटींच्या मोठ्या पुलाचे बांधकामचंद्रपूर-वणी-यवतमाळ रस्त्यावरील घुग्घूस गावाजवळ वर्धा नदीवर असलेला अस्तित्वातील पूल वाहतुकीसाठी अरूंद असल्यामुळे, दुसरा मोठा पूल अस्तित्वातील असलेल्या पूलाचे बाजूने बांधण्याचे ठरले आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता २७ कोटी रुपये असून पूलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. सदर पूलाची लांबी २५१ मीटर असून रूंदी १२ मीटर आहे. सदर पुलाचा बांधकाम कालावधी १८ महिने असून जानेवारी २०१० मध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. चंद्रपूर-वणी रस्ता चार पदरी आहे. परंतु अस्तित्वातील पूल फक्त दोन पदरी असल्यामुळे नविन पुलाचे बांधकाम केल्यास पुलावरूनसुध्दा चार पदरी वाहतुक सुरू होईल, अशी माहिती ना.सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.