शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दोन टप्प्यांमध्ये विकसित होणार विमानतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:42 IST

राजुरा तालुक्यातील विहिरगाव व मूर्ती येथील जमिनीवर ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमान विकास कंपनीकडून २० मार्च २०१८ ला तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला सरकारने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असून दोन टप्प्यांमध्ये विमानतळाचा विकास केला जाणार आहे.

ठळक मुद्दे४७ कोटींचा निधी मंजूर : राजुरा तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाला मिळणार चालना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा तालुक्यातील विहिरगाव व मूर्ती येथील जमिनीवर ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमान विकास कंपनीकडून २० मार्च २०१८ ला तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला सरकारने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असून दोन टप्प्यांमध्ये विमानतळाचा विकासकेला जाणार आहे.विहिरगाव व मूर्ती येथील प्रस्तावित ग्रीनफिल्ड विमानतळासाठी भारतीय विमान प्राधिकरणातर्फे ३ जानेवारी २०१८ ला सर्व्हेक्षण करण्यात आले होते. या सर्व्हेक्षणानुसार निश्चित केलेली जागा विमानतळासाठी प्राथमिकदृष्ट्या योग्य असल्याचे प्राधिकरणाने मान्य केले. याशिवाय प्रस्तावित विमानतळाचा विकास दोन टप्प्यांमध्ये करण्यासाठी प्राधिकरणातर्फे राज्यसरकारला सुचनाही देण्यात आल्या आहेत.ग्रीनफिल्ड विमानतळाची उभारणी व विकास करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीसाठी विशेष हेतू संस्था म्हणून प्राधिकृत केले. प्रस्तावित जमिनीमधील ३३२.६० एकर शासकीय जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला विनामूल्य उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने गुरुवारी मान्यता प्रदान केल्याने येत्या काही महिन्यांतच पायाभूत कामांना सुरुवात होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्राने वर्तविली. भूमिसंपादन पूनर्वसन व पूर्नस्थापना करताना भरपाई देणे व पारदर्शक अधिनियम २०१३ अंतर्गत थेट खरेदी करण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. ग्रीनफिल्ड विमानतळासाठी संपादीत करावयाच्या खासगी जमिनीपैकी ४६३.७३ एकर जमीन संपादनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापन आणि जिल्हाधिकाºयांनी राज्य शासनाकडे कळविले होते. त्यानुसार ४१ कोटी आणि इतर खर्चासाठी ५ कोटी असे एकून ४६ कोटी रुपयांचा निधी देण्यास राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वित्तीय मान्यता दिली आहे.पहिला टप्पापहिल्या टप्प्यानुसार ग्रीनफिल्ड विमानतळाची उभारणी क्यू-४०० व त्यापेक्षा कमी विमानांकरिता प्रस्तावित करण्यात आली. या क्षमतेचे विमान धावपट्टीवर अत्यंत सुरक्षितरित्या उतरावे, त्यासाठी २ हजार ५० मीटर लांब व ४५ मीटर रूंद अशी धावपट्टी बांधण्यात येणार असून ७२० एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.दुसरा टप्पाया टप्प्यामध्ये ए-३२० व त्यापेक्षा कमी प्रकारच्या विमानांकरिता सुमारे ३ हजार मीटर लांब व ४२ मीटर रुंद धावपट्टीची गरज आहे. महाराष्ट्र विमान विकास कंपनीच्या निर्देशानुसार अत्याधुनिक विमानांच्या सुरक्षेसाठी ही धावपट्टी सक्षम ठरणार असून त्यासाठी १२१ एकर अतिरिक्त जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे.खासगी जमिनीसमोरील अडचणीविमान कंपनी प्राधिकरणाच्या निकषांनुसार चंद्रपूर विमानतळासाठी एकूण ८४० एकर जमिनीचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. त्यामध्ये ५०७.४० एकर खासगी आणि सरकारी व वनजमिनी मिळून एकून ३३२.६० एकर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. सरकारी व वनजमिन ताब्यात घेण्यासाठी सरकारला अडचण येणार नाही. मात्र, ५०७.४० एकर खासगी जमीन अधिग्रहित करताना पूर्नवसन व पूर्नस्थापनाच्या प्रश्नांना सरकारला सामोरे जावे लागणार आहे. सरकार यातून कसा मार्ग काढेल, यावरच प्रास्तावित ग्रीनफिल्ड विमानतळाचे भविष्य अवलंबून आहे.