शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

चिमूर परिसरात नागरिकांना जवळून होणार विमानाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 6:00 AM

आय.आय.सी. टेक्नॉलॉजी हैद्राबाद यांच्या फॅक्स संदेशान्वये चिमूर तालुक्यातील हरणी, खुटाळा, खांबाला या परिसरातून २६ फेब्रुवारी २०२० ते ०४ मार्च २०२० या कालावधीत विशेष विमानाच्या सहाय्याने हवाई सर्व्हे होणार आहे. सदर हवाई सर्व्हेदरम्यान कमी उंचीवरील हवाई उड्डाने (जमिनीपासुन २५० फुट) उंचीवर होणार आहेत.

ठळक मुद्दे२६ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत हवाई सर्व्हे होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : दळणवळनाचे तीन मार्ग भूपृष्ठ, जल व हवाई यामधील हवाई वाहतूक ही सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरच असते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला विमानाचे आजही कुतुहलच. मात्र एका सर्वेक्षणासाठी चिमूर तालुक्यातील खांबाला, हरणी व खुटाळा या गावातील परिसरातून जमिनीपासून २५० फुटावरून विमान घिरटया घालणार आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यातील या गावांना जवळून विमानाचे दर्शन होणार आहे.आय.आय.सी. टेक्नॉलॉजी हैद्राबाद यांच्या फॅक्स संदेशान्वये चिमूर तालुक्यातील हरणी, खुटाळा, खांबाला या परिसरातून २६ फेब्रुवारी २०२० ते ०४ मार्च २०२० या कालावधीत विशेष विमानाच्या सहाय्याने हवाई सर्व्हे होणार आहे. सदर हवाई सर्व्हेदरम्यान कमी उंचीवरील हवाई उड्डाने (जमिनीपासुन २५० फुट) उंचीवर होणार आहेत.त्यादृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी यांनी हवाई सर्वे कालावधीत कमी उंचीवरील हवाई उड्डाने व अन्य इतर कारणावरुन आपले कार्यक्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही , याबाबत दक्षता व सतर्कता बाळगण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.हा हवाई सर्व्हे कशासाठी आहे, हे माहीत नसले तरी चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या कानात विमानाचा आवाज एक आठवडा गुंजणार असून २५० फुटावरून विमान बघण्याचा आनंदही घेता येणार आहे.या कालावधीत हवाई सर्व्हेदरम्यान विमान गोंदिया, नागपूर जिल्ह्यातील काही गावावरून व छत्तीसगड राज्यातील काही गावांवरूनही विमान घीरट्या घालणार आहे.