शेतकऱ्यांची कामे ठप्प : काम बंद ठेवण्याचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : विविध मागण्यांसंदर्भात कृषी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून आंदोलन सुरू केले आहे. शेतीच्या हंगामात कृषी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे रखडली आहेत.कृषी विभागाच्या सुधारीत आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा, तयार करताना संघटनेला सोबत घ्यावे, सुधारीत आवृत्ती बंधात कृषी सहायकाचे पदनाम सहायक कृषी अधिकारी करण्यात यावे, कृषी सहायकामधून कृषी पर्यवेक्षकाची पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षाचा कालावधी हा शिक्षण सेवकाप्रमाणे आश्वासीत प्रगती योजना व इतर सर्व लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावा आदी मागण्यांसंदर्भात कृषी सहायक संघटनेने १६ जूनपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. १९ जून रोजी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर धरणे, २१ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, २७ ला कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे मोर्चा व १० जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीविषयक कामे रखडली आहेत.तरी या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष व्ही.के. ठोंबरे, सचिव पी.एस. लोखंडे यांनी केले आहे.
कृषी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू
By admin | Updated: June 18, 2017 00:31 IST