शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता होत आहे शेतजमिनीचा व्यवहार; दिशाभूल करणाऱ्या कंपनीला शासन लावेल का वेसण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:19 IST

Chandrapur : याबाबत काही शेतकरी बांधवांनी बल्लारपूर तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्याकडे यासंदर्भात निवेदन दिले आहे.

सुभाष भटवलकर लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे या गावामध्ये एक कोळसा काढणारी प्रायवेट लिमिटेड कंपनी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करून प्रलोभन दाखवत त्यांची शेती दलालामार्फत कमी किमतीने विकत घेत असून, शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता शेती चोर मार्गाने घेत असल्याचा घाट आखला जात आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. यावर शासनाने त्वरित निर्बंध लावून गावातील सर्व शेतकऱ्यांची सभा घेत शेती खरेदी-विक्रीला अनुमती द्यावी, अशी मागणी नांदगाव (पोडे) परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत काही शेतकरी बांधवांनी बल्लारपूर तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्याकडे यासंदर्भात निवेदन दिले आहे. काही महिन्यांपासून नांदगाव पोडे गावात दलालामार्फत तथाकथित कोळसा काढणारी एक प्रायवेट लिमिटेड कंपनी प्रलोभन दाखवून शेत खरेदी करत आहे. यामुळे कवडीमोल भावाने शेतकऱ्यांची शेतजमीन ते गिळंकृत करत आहे व आपला हेतू सिद्ध करत आहे. याबाबत तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार व योग्य कारवाई करणार, असे सांगितले.

गोपनीय पद्धतीने सुरू आहे गोरखधंदाएवढ्या गोपनीय पद्धतीने खरेदी-विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. काही शेतकऱ्यांना याची कुणकुण लागली. त्यांनी यासंदर्भात बल्लारपूर तहसीलदार कोकाटे यांना निवेदन दिले. याबाबत योग्य कारवाई करून गावातील सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेत शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करूनच नंतर शेती महाराष्ट्र सरकार अधिग्रहण कायद्यानुसार घ्यावी. ज्या शेतकऱ्यांच्या शेती चोर मार्गाने घेतली आहे. त्या सर्व शेतीची रजिस्ट्री व फेरफार त्वरित थांबवण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीFarmerशेतकरी