शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पार्श्वभूमीवर आता राज्यातील रुग्णांची ‘सारी टेस्ट’ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 19:20 IST

यापुढे राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांनी बाह्य व आंतर रुग्णांची सेवीअर अ‍ॅक्युट रिस्पायरेटरी इलनेस (सारी) तपासणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देकोवीड संशयितांच्या नमुन्यात एच १ एन १ पॉझिटीव्ह आढळल्याने हा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कराजेश भोजेकरचंद्रपूर : राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या कोवीड-१९ रुग्णांच्या संख्येमध्ये सतत वाढ होते आहे. गेल्या आठवड्यात ३ रुग्णांचा खूप कमी कालावधीचा आजार असतानाही दुदैवी मृत्यू झाला. तसेच काही कोवीड-१९ संशयित रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे (थ्रोट स्वॅब) नमुने प्रयोगशाळेच्या अहवालानुसार एच १ एन १ साठी पॉझिटीव्ह आले. ही बाब राज्य शासनाच्या आरोग्य संचालनालयाच्या लक्षात आली आहे. या आधारे रुग्णांना लवकर उपचार मिळावेत आणि मृत्यू टाळता यावा, यासाठी यापुढे राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांनी बाह्य व आंतर रुग्णांची सेवीअर अ‍ॅक्युट रिस्पायरेटरी इलनेस (सारी) तपासणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्या आहेत.‘सारी’ अंतर्गत ५ वर्षांवरील व्यक्तींना अचानक सुरू झालेला ३८ अंश सेल्सिअस ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे वा श्वास घेण्यास त्रास होणे. तसेच रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासणे अशा रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. शिवाय ५ वर्षांखालील मुले ज्यांना निमोनिया झाला आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे. अशा मुलांचीही सारी अंतर्गत तपासणी करण्याच्या मार्गदर्शक सूचना पुणे येथील राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेल्या आहेत.‘सारी’ रुग्ण आढळल्यास त्यांना त्वरीत १०८ अ‍ॅम्बुलन्सद्वारे जवळच्या कोवीड-१९ साठी निश्चित केलेल्या १०० व त्यापेक्षा जास्त खाटा असणाºया रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. या रुग्णास कोवीड सस्पेक्ट कक्षात भरती करून लक्षणानुसार उपचार सुरू करावयाचा आहे. तसेच घशातील स्त्रावाचा नमुना घेऊन तो कोवीड-१९ तपासणीसाठी त्या रुग्णालयासाठी निश्चित केलेल्या प्रयोगशाळेत पाठवायचा आहे. प्रयोग शाळेचा अहवाल प्राप्त होईपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे क्लिनिकल डायग्नोसिस कोवीड -१९ असल्यास रुग्णास उपचारही सूचविला आहे.अहवालानंतर घ्यावयाची काळजीरुग्णाचा घशातील स्त्रावाच्या तपासणीचा अहवाल कोवीड-१९ व एच १ एन १ दोन्हीसाठी निगेटीव्ह आल्यास जनरल वॉर्डमध्ये हलवून लक्षणानुसार उपचार करावयाचा आहे. अहवाल एच १ एन १ व कोवीड-१९ निगेटीव्ह आल्यास रुग्णास एच १ एन १ आयसोलेशन फॅसिलिटीला हलवून एच १ एन १ उपचार करावयाचा आहे. आणि अहवाल कोवीड- १९ पॉझिटीव्ह आल्यास रुग्णास कोवीड -१९ आयसोलेशन वॉर्डात हलवून लक्षणानुसार उपचार करावयाचा आहे. प्रकृती अत्यवस्थ असल्यास त्वरीत कोवीड -१९ आयसीयुमध्ये दाखल करावयाच्या सूचनाही राज्यातील आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस