लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी जारी करताच चंद्रपूर जिल्ह्यातही सहकारी क्षेत्रातील हालचालींना वेग आला. सुमारे २५० पेक्षा अधिक सहकारी संस्थांची निवडणूक होणार असल्याने प्रारूप मतदार याद्या तयार१ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ एप्रिल २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत पूर्ण करावी, अशा सूचना असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन कामाला लागला आहे. सरकारने सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचा आदेश संपुष्टात आल्यामुळे निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील त्या टप्प्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल. निवडणुकीसाठी १ एप्रिल ही अर्हता गृहीत धरून पात्र असलेल्यांची प्रारूप मतदार यादी तयार केली जात आहे. ज्या क्रमाने संचालक मंडळाची मुदत संपली आहे, त्याच अनुक्रमे या सहकारी संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडावी, असे सहकार विभागाला निर्देश आहेत.
असा आहे जिल्हास्तरीय निवडणूक आराखडा- जिल्हा निवडणूक आराखड्यानुसार निवडणुकीचे टप्पे ठरविण्यात आले. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्था, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, टप्प्यातील संस्था १ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत निवडणुकीसाठी पात्र सर्व कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे
निवडणूक जाहीर झाल्याने चैतन्य - कोरोनामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांना मरगळ आली. मुदत संपूनही निवडणुका न झाल्याने केवळ प्रशासकीय कारभार हाकला जात आहे. - नवीन योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रश्नच नाही. सहकारी संस्थांचा कारभार थंडबस्त्यात होता. - राज्य सरकारने मंगळवारी निवडणुकीची घोषणा केली. सहकार विभागही सक्रिय झाला. त्यामुळे सहकार क्षेत्रात सध्या चैतन्य निर्माण झाले आहे.- आदेश धडकल्याने सहकारी क्षेत्रातील विविध गट निवडणूकीसाठी सक्रीय झाले आहेत.