शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ई-चालानानंतरही वाहनधारक पोलिसांमध्ये वाद कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:21 IST

वाहतूक नियमांचे सतत उल्लंघन करणे, कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून अनेकवेळा कामात अडथडा निर्माण करणे या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी अक्षरश: त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने ई-चालनाद्वारे दंड आकारणे सुरु केले आहे. असे असले तरी वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमधील वाद काही कमी झाले नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

ठळक मुद्देहोणार कारवाई : वाहतूक नियम मोडणारच ही वृत्ती घातकच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाहतूक नियमांचे सतत उल्लंघन करणे, कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून अनेकवेळा कामात अडथडा निर्माण करणे या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी अक्षरश: त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने ई-चालनाद्वारे दंड आकारणे सुरु केले आहे. असे असले तरी वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमधील वाद काही कमी झाले नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.दंड आकारणीच्या रोख व्यवहारात पोलीस कर्मचारी अपहार करतात, असा आरोप नागरिकांचा होता. यावर आळा घालण्यासाठी ई- चालान दंड आकारण्यात येत आहे. मोबाईल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर दुचाकीस्वाराचा फोटो काढून तो आॅनलाईन पाठविला जात असून त्याद्वारे दंड वसूल केला जात आहे.वाहतूक नियमांचे पालन केल्यास पोलीस हटकणार नाही. मात्र नियम मोडणार आणि पोलिसांना पाहून न पाहिल्यागत करीत सुसाट वाहनावरून पळून जाणे हे नियमांविरूध्द आहे. जीवन मौल्यवान आहे. धावत्या वाहनावर फोन वापरू नका, वाहतूक नियमांचे पालन करा, रूग्णवाहीकेला रस्ता मोकळा करून द्या, असे समुदपदेशन अनेकवेळा केले जाते. मात्र वाहनधारक याकडे दुर्लक्ष करून वाहन चालवितात. त्यामुळे अनेकवेळा वाहतूक पोलीस आणि वाहनधारकांमध्ये भांडणे सुद्धा होत आहेत.वाहन अडवून त्यांची चावी काढून घेणे, हा प्रकार वाहतूक कर्मचाऱ्यांनी टाळायला हवा आॅनलाईन दंड ई-चालनचा वापर करा, असे त्रस्त वाहनचालकाचे म्हणणे होते. त्यानुसार ई-चालान सुरु करण्यात आले आहे. मात्र पोलीस आणि वाहन धारकांमधील धुसफूस कमी झालेली नाही. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.नागरिकांनी आपली मानसिकता बदलावी. कुणीही कायदा हातात घेऊ नये, वाहतुकीचे नियम पाळावे. आपल्यामुळे दुसऱ्या वाहनधारकांना त्रास होऊ नये याची काळजी वाहनधारकांनी घ्यावी. वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील त्यांना दंड भरावा लागेल.-किसन शेळकेवाहतूक पोलीस निरीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस