शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

 अखेर 'तो' बिबट्या जेरबंद! सिंदेवाही परिसरात होती दहशत, वनविभाग व एफडीसीएमला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 17:03 IST

मागील काही दिवसांपासून सिंदेवाही परिसरात बिबट्याची दहशत होती. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न सुरू होते. मात्र बिबट हाती लागत नव्हता. अखेर बुधवारी सकाळी वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट अडकला. त्यामुळे वनविभाग व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.  

सिंदेवाही (चंद्रपूर) : मागील काही दिवसांपासून सिंदेवाही परिसरात बिबट्याची दहशत होती. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न सुरू होते. मात्र बिबट हाती लागत नव्हता. अखेर बुधवारी सकाळी वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट अडकला. त्यामुळे वनविभाग व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.  लोनवाही येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील परिसरात एक महिन्यांपासून बिबट कुत्र्यांवर हल्ला करून ठार मारत होता. या बिबट्याचे अनेक नागरिकांना रस्त्यावर दर्शन झाले होते. त्यामुळे पसिरातील नागरिक पहाटे व सायंकाळी घराबाहेर पडण्यास घाबरत होते. परिसरात बिबट्याची दहशत वाढली होती. वनविभाग व एफडीसीएमच्या सहकार्याने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बिबट्याला पकडण्यासाठी बाजार समितीच्या मागील परिसरात पिंजरा लावण्यात आला. त्यामध्ये पाळीव कुत्रा ठेवण्यात आला. बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बिबट हा कुत्र्यांच्या शिकारीसाठी आला असता पिंजºयात जेरबंद झाला. ही घटना लक्षात येताच नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होवून जेरबंद बिबट्याला कुठे हलविणार याबद्दल निर्णय घेतील, असे क्षेत्रसहाय्यक पी. एम. करंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

वाघाची दहशत कायमसिंदेवाही येथील प्रभाग क्रमांक १४ मधील रहिवासी कमल केशव निकोडे यांच्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना १० डिसेंबरला उघडकीस आली होती. कमल निकोडे या लगतच्या जंगलात झाडूच्या काळ्या जमा करण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून या परिसरात आणखी दहशत पसरली होती. बुधवारी जेरबंद झालेला बिबट असल्याने वाघाची दहशत मात्र कायम आहे.

टॅग्स :leopardबिबट्या