शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १९५ गावांना मिळाला १ कोटी १ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:05 IST

अनुसूचित जमाती क्षेत्रातील १९५ गावांना पेसा अंतर्गत ५ टक्के थेट निधी न मिळाल्याने शेकडो विकासकामे रखडली होती. उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि पावसाळ्यातील संभाव्य उपाययोजना आदी कामे करताना ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडी झाली होती.

ठळक मुद्देरखडलेली कामे मार्गी लागणार : ग्रा.पं. व ग्रामसभा पदाधिकाऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनुसूचित जमाती क्षेत्रातील १९५ गावांना पेसा अंतर्गत ५ टक्के थेट निधी न मिळाल्याने शेकडो विकासकामे रखडली होती. उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि पावसाळ्यातील संभाव्य उपाययोजना आदी कामे करताना ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडी झाली होती. आदिवासी विकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर १ कोटी १ लाख १७ हजार ६३ रूपयांचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळणार आहे.अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययाचा ५ टक्के निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने पेसा कायद्या अंतर्गत घेतला आहे. जिवती पंचायत समितीमधील ३१ ग्रामसभांमधील ७३ गावे, राजुरा पंचायत समितीच्या ३३ ग्रामसभामधील ५९ गावे आणि कोरपना पंचायत समिती क्षेत्रातील ३० ग्रामसभांमधील ६३ गावांना सन २०१८-१९ वर्षाचा आदिवासी उपयोजनेचा ५ टक्के निधी मिळाला नव्हता. या वर्षात करावयाच्या कामांचा आराखडाही ग्रामसभेने तयार केला.परंतु, आदिवासी विकास विभागाने हा निधी देण्यास विलंब केला. त्यामुळे लाखो रूपयांची विकासकामे रखडली. विशेष म्हणजे, मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात ग्रामपंचायतींची कोंडी झाली. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली.पण, ग्रामपंचायतींकडे निधी नसल्याने कामे करता आली नाही. दरम्यान, जिल्हा परिषदने काही गावांमध्ये पाणी टंचाईवर उपाययोजना केल्या. मात्र, मोठी कामे रखडली. सामाजिक कल्याणांच्या योजना राबविण्यासाठी निधी नसल्याने ग्रामसेवक हतबल झाले होते. आदिवासी विकास विभागाचे कार्यासन अधिकारी गजानन देशमुख यांनी ३१ शासननिर्णय जारी करून राजुरा, कोरपना व जिवती पंचायत समितीमधील १९५ गावांना १ कोटी १ लाख १७ हजार ६३ रूपये मंजूर झाल्याचे कळविले.हा निधी ग्रामपंचायतच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. त्यानंतर सभा घेऊन आवश्यक असलेली विकासकामे पूर्ण केली जातील, अशी माहिती ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी दिली.निधीसाठी दरवर्षी होणारा विलंब टाळावापेसा गावांनी ग्रामसभा घेउन विकास कामांचे प्राधान्य ठरविले होते. जिवती, राजुरा, कोरपना, या पंचायत समिती क्षेत्रातील १९५ गावांनी विकासाचा आराखडा तयार करून निधीची प्रतीक्षा करीत होते. पण निधी न मिळाल्याने कामे ठप्प होती. आदिवासी विकास विभागाने हा निधी आरटीजीएस प्रणालीद्वारे ग्रामपंचायतींना देणार आहे. त्यामुळे प्रलंबित विकासकामे मार्गी लागू शकतात. परंतु, निधी देण्यास दरवर्षी होणारा विलंब सरकारने टाळावा, अशी मागणी ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी केली आहे.