आठवणी शाळेतील सोहळा : जुन्या आठवणींना दिला उजाळा
चंद्रपूर : शाळा सोडून कितीही वर्षे झाली तरी बालपणातील मित्र, मैत्रिण व शाळेच्या आठवणी नेहमीच मनात असतात. या आठवणी पुन्हा ताज्या व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा परिषद हायस्कुल भद्रावती येथे शिकलेले विलास बोबडे व मनिषा कापकर- काळे यांनी १९८९-९० च्या बँचचे विद्यार्थी एकत्र आणले. आठवणी शाळेतील उपक्रमांतर्गत गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी अशा अभूतपूर्ण बालमित्रांची पुन्हा ३१ वर्षानंतर भेट घडून आली आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यात आला.
शाळा संपली आणि प्रत्येक जण आपआपल्या कामात गुंतले. त्यामुळे बालपणींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कुल भद्रावती येथे २९८५-१९८६ ते १९८९-९० मध्ये शिकलेल्या बालमित्रांनी भेट घडवून आणली.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी १९९० च्या बँचचे वर्गशिक्षक मोहन पवार, अमरावतीचे संदीप धोटे व वरोरा येथील अनिल काळे हे होते. या माजी विद्यार्थ्यांनी कडुनपवार यांचा सत्कार केला. या शाळेतील मृत पावलेल्या शिक्षकांना तसेच मृत बालमिञांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विलास बोबडे. मनिषा कापकर- काळे, शालिनी पाटील गोरघाटे, संजय पंडागळे, राजू तिरपुडे, सुषमा पद्मगीरवार, बुर्रेवार गजानन भुसारी, नरेश कोठे, नंदकिशोर नांदे, प्रेमिला शेरकी वारके, अर्चना गावंडे धोटे, सुभाष रोडे, महेश बदखल व सर्व बालमित्रांनी मनोगत व्यक्त केले. संचालन संजय पंडागळे, प्रास्ताविक विलास बोबडे आणि आभार मनिषा कापकर-काळे यांनी मानले.
सोहळ्याचे नियोजन विलास बोबडे, मनिषा कापकर काळे, अभय ऊमरे, चन्द्रशेखर मस्के, नंदकिशोर नांदे ललिता पचारे मांढरे, अर्चना पाल आरेकर, शुभांगी लुथडे सरोदे, रंजना ताजने मिलमिले, संजय आतकुलवार, बाबाराव पारखी, नरेंद्र बोन्सुले, आदेश फुलझेले, बिपीन मोघे, सुभाष भोयर, जितेन्द्र बिश्वास, अनमोल दुपारे, राजु श्रीवासकर, मजहर अली सय्यद, सुधीर निलगीलवार, हेमलता उपगन्लावार कासनगोटुवार, भावना पुण्यपवार गांगरेड्डीवार आदींनी केले.