शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंधराही पंचायत समितींवर आजपासून प्रशासकराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहीत मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले असून निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निर्देश दिले होते. यावरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा ५) ५ मधील कलम ९१  ब आणि ७५ ब या कलमानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २१ मार्चपर्यंत तर पंचायत समितीचा १३ मार्चपासून कार्यकाळ संपल्याने दोन्ही संस्थावर प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पंधराही पंचायत समितींचा कारभार आजपासून प्रशासक सांभाळणार आहे. दरम्यान,सभापतींच्या ताब्यातील वाहने जमा करण्यात येणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहीत मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले असून निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निर्देश दिले होते. यावरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा ५) ५ मधील कलम ९१  ब आणि ७५ ब या कलमानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. निवडणुकीतून पदे भरली जातील तोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून कामकाज सांभाळणार आहे. तर पंचायत समितीतही गटविकास अधिकारी कारभार सांभाळणार आहे. सध्यास्थितीत चंद्रपूर जिल्हा परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. तर आठ पंचायत समितीवर भाजप आणि ७ वर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीनंतर ही सत्ता नेमकी कुणाकडे जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे निवडणूक लांबणीवर गेली असली तरी राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरू केली आहे.

पदाधिकारी निवडी पर्यंत अधिकारीजिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे,त्याचप्रमाणे पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे आदेशात म्हटले आहे. ही नियुक्ती चार महिन्यांपर्यंत किंवा जि. प. अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समितीचे सभापती, उपसभापतींची पदे निवडणुकीद्वारे भरले जातील,यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत प्राधिकृत अधिकारी राहतील असे आदेश आहे.

८ पं. स. वर भाजप ७ वर काँग्रेसची सत्ताचंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा पंचायत समितींमध्ये आठ पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व आहे. तर उर्वरित पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता आहे. दरम्यान,वरोरा येथे राजकीय उलथापाथलीमध्ये काँग्रेसकडे तर सावलीमध्ये टाॅस झाल्यानंतर काँग्रेसकडे सत्ता गेली. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती