शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेतीसाठ्यावर प्रशासनाची करडी नजर, तीन पथकांचे गठन

By साईनाथ कुचनकार | Updated: April 12, 2023 23:55 IST

पोलिसांची मदत : कारवाई करण्याचेही दिले टार्गेट

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध खनन, साठवणूक तसेच वाहतूक केली जात आहे. यासंदर्भात थेट जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले असून त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांचे कान टोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी रेती तस्करांवर कारवाई करणे सुरू केले आहे. दरम्यान, तहसीलस्तरावर विविध पथकांचे गठन केल्या जात आहे. चंद्रपूर तालुक्यातीत रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी तीन पथकांचे गठण करण्यात आले आहे. हे पथक लक्ष ठेवून राहणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक महिन्याला कारवाईचे त्यांना टार्गेटही देण्यात आले आहे.

औद्योगिक जिल्हा तसेच मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जात असल्याने रेतीची मोठी मागणी आहे. त्यामुळे रेती तस्कर लपून-छपून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करीत आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून पर्यावरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी रेती तस्करांवर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उचित कारवाई करीत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तालुका प्रशासनांनी रेती तस्करी रोखण्यासाठी पथकांचे गठन केले आहे.बाॅक्स

चंद्रपुरात या पथकांमध्ये समावेश पथक एक

पथक प्रमुख जितेंद्र गादेवार नायब तहसीलदार (प्रभारी तहसीलदार), पोलिस उपनिरीक्षक, पोलिस स्टेशन रामनगर, बिट जमादार संबंधित विभाग, मंडळ अधिकारी, चंद्रपूर सर्कल, यांच्यासह बोर्डा, पिंपळखुट, जुनोना, चांदा रे. दुर्गापूर येथील तलाठी, संबंधित क्षेत्राचे कोतवार.पथक २

पथक प्रमुख राजू धांडे, नायब तहसीलदार, पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन पडोली, बिट जमादार संबंधित विभाग, मंडळ अधिकारी पडोली, यांच्यासह ताडाळी, मोरवा, पडोली, पदमापूर येथील तलाठी, तसेच कोतवाल.पथक ३

पथक प्रमुख सचिन खंडाळे, नायब तहसीलदार, पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन घुग्घुस, बिट जमादार, मंडळ अधिकारी घुग्घुस सर्कल यांच्यासह घुग्घुस, नागाळा, पिंपरी येथील तलाठी तसेच संबंधित क्षेत्राचे कोतवाल.

टॅग्स :sandवाळूchandrapur-acचंद्रपूरPoliceपोलिस