शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकांच्या हाती जि.प.चा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहित मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निवडणूक आयोगाने सरकारला कळविले होते. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा ५ मधील कसलम ९१ ब आणि ७५ ब या कलमानुसार जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार आता प्रशासकांच्या हातात गेला आहे. दरम्यान, विविध बिल, कामे करून घेण्यासाठी मागील काही दिवसांत जिल्हा परिषद परिसरात पदाधिकारी, सदस्यांची सारखी वर्दळ बघायला मिळाली. विशेष म्हणजे निवडणूक होईपर्यंत, म्हणजे पुढील किमान सहा महिने प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषदेचा कारभार चालविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहित मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निवडणूक आयोगाने सरकारला कळविले होते. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा ५ मधील कसलम ९१ ब आणि ७५ ब या कलमानुसार जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपचे ३३, तर काँग्रेस २० सदस्य निवडून आले होते. त्यामुळे भाजपची एकहाती सत्ता होती. अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्या संध्या गुरुनुले विराजमान होत्या. निवडणुकीसाठी बराच कालावधी असल्यामुळे  इच्छुकांना तयारीसाठी वेळ मिळणार आहे. विशेष म्हणजे, गावागावात गाठीभेटीला मात्र वेग आला आहे.

सतत पाचवेळा निवडून येण्याचा पराक्रमजिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले या मूल तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्रातून सतत पाच वेळा निवडून आल्या आहेत. १९९९ मध्ये त्यांच्याकडे महिला व बालकल्याण समिती सभापतिपद होते. त्यानंतर १४-१५ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले. दरम्यान, मागील अडीच वर्षांपासून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आहे. दीर्घ अनुभवामुळे त्यांची प्रशासनावर चांगलीच पकड होती.

२२ वर्षांनंतर ते झाले माजी

प्रथम सात वर्षे ग्रामपंचायत सदस्य आणि त्यानंतर तीन पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेवर निवडून आलेले काँग्रेसचे डाॅ. सतीश वारजुकर हे तब्बल २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच रविवारपासून माजी सदस्य झाले. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळले आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद