शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सफर; पोलीस प्रशासनाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 11:20 IST

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील ८४ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शन या उपक्रमाअंतर्गत शहरात दाखल झाले़त़

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यातील ८४ विद्यार्थ्यांचा सहभाग

वसंत खेडेकर ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील ८४ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शन या उपक्रमाअंतर्गत शहरात दाखल झाले़त़शहरातील प्रशस्त रस्ते, उद्यान, शोभीवंत इमारती, सोयीसुविधा आणि चकचकीतपणा बघून दीपून गेले. हे सारे दृश्य बघितल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात अशा सोईसुविधा कधी येणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला़ एटापल्ली तालुक्यातील दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न उमटले़ अतिदुर्गम भागातील १४ ते१८ वयाचे एकूण ८४ विद्यार्थी- विद्यार्थिनी  महाराष्ट्र दर्शनावर निघाले आहेत. मंगळवारी बल्लारपूरला दाखल झालेत़ बल्लारपूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन स्वागत केले. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना एका विद्यार्थिनीने विचार करायला लावणारा हा प्रश्न उपस्थितांसमोर मांडला़ अन्य विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून शहराविषयीचे कुतूहल जागृत केले़  महाराष्ट्र दर्शन आमच्याक़रिता अगदी नवीन आणि मनात आत्मविश्वास जागविणारा आहे़ नवे जग प्रत्यक्ष बघण्याचा, अनुभव घेण्याचा आहे, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले़ त्यातील बहुतेक विद्यार्थी स्वत:चे गाव सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्यांच्यात काहीसा बुजरेपणाही दिसून येत होता. मात्र, या सफरीने ते आनंदीत झाले होते़ एका विद्यार्थ्यांने आपले अनुभव इंग्रजीतून कथन केले. पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी स्वागतपर भाषणातून विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक केले़ गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांची ही सफर महाराष्ट्र दर्शनासाठी निघाली आहेत़ विद्यार्थ्यांसोबत गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अनिल तांदोळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण देशमुख आदी सहभागी झाले आहेत. पोलीस आणि आदिवासी विकास विभागाकडून या सहलीचे आयोजन करण्यात आले़ विद्यार्थ्यांनी पुस्तकातून जे वाचले ते त्यांनी प्रत्यक्ष बघावे़ मुख्य प्रवाहात मिसळावे, हा या सहलीचा मुख्य उद्देश असल्याचे तांदोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांची ही सफर २१ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र भ्रमण करणार आहे. चंद्रपूर, ताडोबा, शेगाव, नागपूर, आणि पेंच प्रकल्पालाही भेट देणार आहेत़ ही १७ वी सफर असून आतापर्यंत दोन हजार विद्यार्थ्यांना  महाराष्ट्र दर्शन सहलीत सहभागी झाले आहेत़

विद्यार्थ्यांचे बल्लारपुरात स्वागतया सफरीत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी दिसलेत. बल्लारपुरातील पोलीस ठाण्यात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले़ यावेळी ध्वनिक्षेपक लावण्यात आला होता़ आदिवासी बोलीतील गीत सुरू करताच विद्यार्थ्यांनी तालसुरात आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली़

टॅग्स :Studentविद्यार्थीPoliceपोलिस