शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आश्रम शाळेच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या पेट्रोल पंपाला ३४ गावांतील आदिवासींचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 16:53 IST

Chandrapur : जमीन अकृषक करण्याच्या प्रस्तावाला आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरपना येथील भाऊराव पा. चटप आदिवासी आश्रमशाळा व संगीता चटप उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १५० मीटर परिसरातील जमीन पेट्रोल पंपासाठी देण्याच्या प्रस्तावाला ३४ गावांतील आदिवासींनी कडाडून विरोध केला आहे. ही जमीन कोणत्याही परिस्थितीत अकृषक करू नये, असा आक्षेप पालकांसह ग्रामस्थांनीही चंद्रपूर जिल्हा आदिवासी संघटनेच्या नेतृत्त्वात सोमवारी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन आक्षेप नोंदविला.

भाऊराव पा. चटप आदिवासी आश्रमशाळा व संगीता चटप उच्च माध्यमिक विद्यालयात कोरपना तालुक्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेच्या १५० मीटर परिसरात सर्व्हे क्र. ३०/४/७/१ आराजी ०.३५ हेक्टर आर. जमीन पेट्रोल पंपाच्या प्रयोजनासाठी अकृषक करण्याची कार्यवाही सुरू आहे.

आदिवासींची मुले आता शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. स्व. भाऊराव पा. चटप आश्रमशाळा सर्वांत मोठी व सुविधाजनक असून, आदिवासी समाजाची ६०० मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेजवळ पेट्रोलंपप सुरू झाल्यास मुलांच्या शिक्षणावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही जागा पेट्रोल पंपासाठी देणे म्हणजे आदिवासींच्या मुलांवर अन्याय करण्यासारखे आहे. निवासी शाळा, वसतिगृह हे सार्वजनिक ठिकाण आहे. या परिसरात कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल पंपाला परवानगी देऊ नये, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा आदिवासी संघटनेने केली आहे. यावेळी संजय सोयाम, गजानन जुमनाके, लक्ष्मण पंधरे, कृष्णा मसराम, विलास मडावी, जितेश कुळमेथे आदी उपस्थित होते.

पेट्रोप पंपावर आक्षेप घेणारी गावेकोरपना, कुकुडबोडी, शिवापूर, दुर्गाडी, कोठोडा, पांडवगुडा, मांडवा, र्यरगव्हाण, चनई, खडकी, बोरगाव, कन्हाळगाव, मांडवा, जांभुलधरा, कढोली, नारंडा, वडगाव, रामपूर, बेलगाव, इंजापूर, गडचांदूर, निजामगोंदी, खिर्डी, सोनुर्ली, वनसडी, जेवरा, सावलहिरा, यैरगाव, धानोली, कुसळ, पिपर्डा, चिंचोली येथील पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी प्रस्तावित पेट्रोल पंपाला विरोध केला आहे.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीchandrapur-acचंद्रपूर