शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या नव्या यादीत ब्रह्मपुरीचा समावेश करा

By admin | Updated: June 19, 2014 23:44 IST

८ तालुक्यांना जिल्ह्यचा दर्जा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी जुनी असल्याने नव्या यादीत ब्रह्मपुरीचा जिल्हा यादीत समावेश करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ब्रह्मपुरी : ८ तालुक्यांना जिल्ह्यचा दर्जा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी जुनी असल्याने नव्या यादीत ब्रह्मपुरीचा जिल्हा यादीत समावेश करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सन १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केली. त्यावेळी गडचिरोली की ब्रह्मपुरीला जिल्ह्याचा दर्जा द्यायचा, यावरून बरेच वादळ उठले होते. गडचिरोली जिल्ह्याचे नाव घोषित होण्यासाठी बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. शेवटी राजकारणात ब्रह्मपुरीचे नाव मागे पडून गडचिरोलीचे नाव जिल्ह्यासाठी घोषित झाले. परंतु ब्रह्मपुरीकरांनी जिल्ह्याची आशा अद्यापही सोडली नाही. नविन जिल्ह्यासाठी शासन दरबारी हालचाली सुरू झाल्या की, ब्रह्मपुरीकरांनी आंदोलने करून निवेदन दिले आहे. परंतु अनेकदा या मागणीला शासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. ज्या तालुक्यांची नावे जिल्ह्यासाठी समोर आली आहेत, त्या तालुक्याला तशी कोणतीही पार्श्वभूमी नाही. केवळ राजकीय हितासाठी त्या तालुक्याचे नाव संभाव्य जिल्ह्याच्या यादीत टाकण्यात आले असल्याचा आरोप ब्रह्मपुरीवासियांकडून केला जात आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी कशी अनुकूल आहे. हे शासनस्तरावर वेळोवेळी पटवून देण्यात आले आहे. तरीही जिल्ह्याच्या यादीत नाव न आल्याने ब्रह्मपुरीवर हा अन्याय आहे. ब्रह्मपुरीला सर्वच उपविवभाग आहेत. वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक वैभव प्राप्त हे शहर आहे. जिल्ह्याच्या निर्मितीसाठी संंभाव्य इमारती उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त नवीन इमारतीसाठी महसूल व वनविभागाची अनेक हेक्टर जागा याचे जाळे चारही बाजूने पसरलेले आहे. फक्त या तालुक्याला राजकीय वारसा नसल्याने ब्रह्मपुरी नेहमी जिल्ह्यासाठी मागे पडत आहे. हा जाणिवपूर्णक करण्यात आलेला अन्याय आहे.. शासनाने जिल्ह्याचे निकष काय आहेत हे प्रसिद्ध करावे जेणेकरून ते निकषही पूर्ण करता येईल असाही राजकीय सुर उमटत आहे. ब्रह्मपुरीवर १९८२ पासून जिल्ह्याच्या बाबतीत अन्याय होतो तो अन्याय जिल्ह्या यादीत टाकून दूर करावा, अशी मागणी सर्वस्तरातून केली जात आहे. (प्रतिनिधी)