शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात सहा हजार वाहनधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:35 IST

वाहनधारकांकडून रहदारीला अडथळा निर्माण करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, अशांवर मागील काही महिन्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत सहा हजार २८५ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१३ लाखांचा दंड : अवैध वाहतृूक, मद्यपींवर पोलिसांची करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : वाहनधारकांकडून रहदारीला अडथळा निर्माण करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, अशांवर मागील काही महिन्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत सहा हजार २८५ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१८ पर्यंत एक वर्षाच्या काळात १३ लाख एक हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.यापूर्वीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या व नुकतेच रूजू झालेले पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाया करण्यात आल्या. बेदरकार वाहनचालकांवर नजर ठेवून वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी राजुरा वाहतूक शिपायांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.राजुरा पोलीस ठाण्यांतर्गत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत २८३ भांदवि कायद्यांतर्गत रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या १५५ वाहनधारकांवर ३१ हजार रुपये दंड, मोटार वाहने कायदा १८५ अंतर्गत दारू पिऊन वाहन चालविणाºया ५८ वाहनधारकांवर ४० हजार सहाशे रुपये, कलम २७९ भादंविअंतर्गत निष्काळजी व भरधाव वाहन चालविणाºया १४ वाहनधारकांवर १४ हजार रुपये दंड, अन्य कलमांतर्गत सहा हजार ५८ वाहनधारकांवर १२ लाख पंधरा हजार चारशे रुपये दंड आकारल्यात आला.यामुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. या कारवाया पोलीस उपविभागीय अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे व नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांच्यासोबत वाहतूक कर्मचारी, नायब पोलीस शिपाई प्रशांत येंडे, विनोद लोखंडे, राधेश्याम यादव आदींनी केली.वाहतुकीची समस्याशहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर राजुरा पोलीस विभागाची करडी नजर असून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि वाढलेली वाहनधारकाची संख्या, त्यातल्या त्यात शहरातील वाढलेले अतिक्रमण यामुळे शहरातील रस्त्याची अवस्था बिकट झालेली दिसून येत आहे. शहराच्या मध्यभागातून राज्य महामार्ग गेल्याने शहरात नेहमीच वाहतुकीची समस्या बनलेली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस