शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावांना निधीचे ग्रहण

By admin | Updated: August 30, 2015 00:35 IST

कृषिप्रधान देश असला तरी शेती व त्यासाठी लागणाऱ्या साधनांकडे सातत्याने शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

रवी जवळे  चंद्रपूरकृषिप्रधान देश असला तरी शेती व त्यासाठी लागणाऱ्या साधनांकडे सातत्याने शासनाचे दुर्लक्ष होत आहे. कधी बियाणे टंचाई, कधी खते टंचाई, महागडी कीटकनाशके आणि पिकांवर रोगांचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. शेतीसाठी सुरक्षित सिंचन म्हणून ज्याकडे बघितले जाते, त्या मामा तलावांची अवस्थाही सध्या वाईट झाली आहे. वर्षानुवर्षापासून साठलेल्या गाळाचा उपसा नाही, फुटलेल्या तलावांची दुरुस्ती नाही. यामुळे जिल्ह्यातील १६७८ मामा तलावांपैकी ७० टक्के तलावांची साठवण क्षमता अत्यंत कमी होऊन धोक्यात आली आहे. तलावांच्या देखभाल व दुरुस्तीकरिता ज्या मापदंडानुसार निधी दिला जातो, तो अतिशय तोकडा असल्याने मामा तलावांसारखे सुरक्षित सिंचन सध्या धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांची अवस्था सध्या अतिशय नाजुक झाली आहे. निसर्गाचा कोप तर त्याच्या पाचवीलाच पूजला आहे. एवढे कमी आहे की काय, म्हणून अलिकडे शासनही शेतकऱ्यांवर कोपत असल्याचे दिसून येत आहे. काबाडकष्ट करून देशाचे उदर भरणारा शेतकरीच उदरनिर्वाहापासून वंचित होऊ लागला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला की बियाणे, खतांची टंचाई होऊ देणार नाही, मुबलक प्रमाणात ते उपलब्ध करू, असे शासन व कृषी विभाग सांगत असला तरी प्रत्यक्षात हंगामात चित्र वेगळे असते. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणाला सामोरे जात शेतकरी कसेबसे बियाणे व खतांची जुळवाजुळव करतो. यासाठी त्याला कृषी केंद्रातील लिंकिंगचाही भुर्दंड पेलावा लागतो. हे झाल्यानंतर पुढे पिकांवरील रोगराई व महागडी कीटकनाशके त्याचे कंबरडे मोडून टाकते. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून तो हंगाम सावरत असतानाच सिंचनाचा प्रश्न उभा ठाकतो.आपला कृषिप्रधान देश असल्याने सिंचनाला मोठे महत्त्व आहे. मात्र सध्या सिंचनाचीच समस्या सर्वाधिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जाऊन आत्महत्येसारखा दुबळा मार्ग नाईलाजाने अवलंबत आहे. सिंचनासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचे मोठमोठे प्रकल्प उभारले आहे. काही प्रकल्प प्रस्तावित असून काही रखङलेले आहेत. असे असले तरी मामा तलावांचे सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. मामा तलावांना सुरक्षित सिंचन (स्र१ङ्म३ीू३्र५ी ्र११्रँ३्रङ्मल्ल) म्हटले जाते. चंद्रपूर जिल्ह्यात १६७८ मामा तलाव आहेत. यातील ७० टक्के मामा तलावांची दुरुस्ती, नूतनीकरण व पुनर्स्थापना करण्याची गरज आहे. वर्षानुवर्ष बुडित क्षेत्रात गाळ साठत आल्यामुळे सद्यस्थितीत सर्व तलावांची साठवण क्षमता अत्यंत कमी झालेली आहे. पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी केवळ मोजक्याच तलावातील गाळ उपसला जातो. हे कार्यही अगदी थातूरमातूर असते. त्यामुळे या उपस्याला फारसे महत्त्व नसते. दोन वर्षांपूर्वी सरासरी ओलांडून मुसळधार पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील अनेक तलाव फुटले होते. त्यामुळे या तलावांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. १७ व्या शतकातील तलावमामा तलावांच्या इतिहासाकडे बघितले असता हे तलाव जवळपास १७ व्या शतकात म्हणजे मालगुजारांच्या काळात बांधण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर १९६४-६५ च्या दरम्यान शासनाकडून या सर्व तलावांची प्रथमत: दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सर्व तलावांची चौफेर दुरुस्ती कधीच झाली नाही.सिंचाई विभागाकडे निधीच नाहीमामा तलाव हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या तलावांची सातत्याने काळजी घेणे आवश्यक आहे. हे तलाव क्षतिग्रस्त झाल्याचे सिंचाई विभागालाही माहीत आहे. मात्र तलाव दुरुस्तीसाठी शासनाकडून व्यापक निधीच येत नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत दरवर्षी तलाव दुरुस्तीसाठी थोडाफार निधी येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सिंचाई विभागातील लेखाधिकारी राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र या निधीने काहीच होत नाही.