शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

आरोपी गवसले, मात्र गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 00:57 IST

कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रतिष्ठित नागरिक डॉ. देवराव जोगी आणि त्यांच्या पत्नी सुधा जोगी यांच्या हत्येच्या तब्बल नऊ महिन्यांतर

नांदाफाटातील जोगी हत्याकांड : नऊ महिन्यांनी पोलिसांना यशचंद्रपूर/नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रतिष्ठित नागरिक डॉ. देवराव जोगी आणि त्यांच्या पत्नी सुधा जोगी यांच्या हत्येच्या तब्बल नऊ महिन्यांतर पोलिसांना गावातच दोन आरोपी गवसले आहेत. या दोन्ही आरोपींनी गुन्ह्यांची कबुलीही दिली आहे. असे असले तरी या हत्याकांडामागील गूढ मात्र कायमच आहे.या हत्याकांडातील प्रमुख आरोपी प्रशांत श्रीनाथ जलवार (२९) आणि दुसरा सहकारी सुरेंद्र डाखरे (३५) या दोघांनीही जोगी दांपत्याच्या हत्येमागील सांगितलेले कारण तपासकर्त्या पोलिसांनाही क्षणभर विचार करायला लावणारे आहे. प्रशांतच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी जोगी यांनी त्याच्यावर चोरीचा आळ घेतला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा राग त्याच्या मनामध्ये होता. तर, सुरेंद्र डाखरे हा १२ वर्षांपूर्वी जोगी यांच्याकडे गायी-म्हशींचे दूध काढण्याचे काम करायचा. आपण दूध पितो, दुधाची चोरी करतो, असा आरोप ते करायचे. अपमान करायचे. त्यानंतर त्यांच्याकडील काम सोडले. त्या अपमानाच्या बदल्याच्या भावनेतून हत्या करण्यात प्रशांतला मदत केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. १२ वर्षांपूर्वीचा राग मनात ठेवणे, चोरीबद्दल हटकल्याच्या कारणावरून दांपत्याचा खून करणे यावर पोलिसांनीही अद्याप पूर्णत: विश्वास ठेवलेला नाही. घरात असलेली खालच्या आणि वरच्या मजल्यावरील रक्कम जशीच्या तशी होती. केवळ चिल्लर १० हजार रूपयांची रक्कम चोरीस गेली होती. घरातील रक्कम आरोपींना दिसली नाही की, मुद्दाम चोरी केली नाही, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी झाली असावी, याबद्दल पोलीसही संभ्रमात आहेत. त्यामुळे या घटनेमागील सत्य शोधण्यासाठी अनेक बारकावे पोलीस शोधत आहेत. प्रशांतने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, तो आधीच बाथरूममध्ये लपून बसला होता. तर, सुरेंद्र बाहेर पाळत ठेवून होता. शेजारच्या घरी असलेल्या कार्यक्रमात जोगी जेवण्यासाठी गेले होते. सुधा जोगी यांचा त्यांच्या मोबाईलवर कॉल आल्याने ते घरी गेले. या काळात प्रशांतने आधी सुधा जोगी यांना रॉडने ठार केले, त्यानंतर देवराव जोगी यांना संपविले. हत्येनंतर फ्रिजमधील गार पाणी पिले. त्यांना ठार केल्यावर काही वेळाने बाहेरून कुणीतरी जोगी यांना आवाज दिला. ती व्यक्ती घरात आली असती तर त्यालाही ठार केले असते, असेही प्रशांतने पोलिसांना थंडपणे सांगितले. प्रशांत अल्टा्रटेक कंपनीत कामगार म्हणून काम करायचा. त्याची पार्श्वभूमी चोरीची आहे. त्याच्या आईवडीलांचा आंतरजातीय आणि आंतरराज्यीय विवाह असून तो मातृभक्त आहे. वडील ओरिसाचे असल्याने तो तिकडे पळून जाण्याच्या बेतात होता. हत्येनंतर काही दिवस तो बंगलोरमध्ये होता. दुसरा आरोपी सुरेंद्र याच्यावरही केबल चोरीचा गुन्हा पोलिसात दाखल आहे. प्रशांत विक्षिप्त स्वभावाचा असून कविता शेरोशायरी म्हणण्यात त्याला आवड आहे. पोलिसांजवळ कबुलीजबाब देतानाही तो सहजपणे शेरोशायरी म्हणत घटनाक्रम सांगत होता, अशी माहिती आहे. हत्या केल्याचे अपराधी भाव अथवा कृत्याबद्दल पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर जराही नव्हता, असे पोलिसांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी) चमूचे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून कौतुकपोलिसांसाठी प्रश्नचिन्ह ठरलेल्या जोगी हत्यकांडातील आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक करणाऱ्या पोलिसांच्या पथकाचे गुरूवारी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी पत्रकार परिषदेत कौतुक केले. ते म्हणाले, या तपासकार्यात सायबर सेल, गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल नायक, सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षिरसागर, शिपाई चंदू नागरे, संपत, संतोष, जॉनी शेडमाके या सर्वांचे त्यांनी कौतुक केले. या सर्वांसाठी पोलीस खात्याकडून १० हजार रूपयांचे त्यांनी बक्षीस जाहीर केले असून सर्वांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले. ही सुपारी की दरोडा ?जोगी दाम्पत्याची हत्या ही सुपारी की दरोडा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या ताब्यात घेतलेला आरोपीला चोरीची पार्श्वभूमी असल्याने हा दरोडा असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे कुणी या दोघांना सुपारी दिली की काय, अशीही चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. असे असले तरी हत्येचे निश्चत कारण कारण अद्यापही समोर आलेले नाही. नाल्यात मिळाला सेटअप बॉक्सहत्येनंतर जोगी यांच्या घरातील टीव्ही व सेटअपबॉक्स गायब होता. प्रशांतला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला बोलते केले. चोरलेला सेटअप बॉक्स आणि टीव्ही नजीकच्या नाल्यातच फेकल्याचे सांगितले. त्यावरून गुरूवारी पोलिसांनी इंजिनद्वारे पाणी बाहेर उपसून शोध घेतला असता नाल्यात सेटअप बॉक्स मिळाला . या हत्याकांडात सुधा जोगी यांच्या अंगावरील सुमारे १ लाख २० हजार रूपयांचे दागिने चोरीस गेले होते. त्याचा तपास लागलेला नाही.