शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरात कोळसा खाणीत दुर्घटना, तीन कामगारांना ढिगा-याखालून काढले बाहेर, अजूनही काही कामागार अडकल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 09:24 IST

वेकोलि माजरीच्या जूना कुणाडा कोळसा खाणीत शुक्रवारी सकाळी मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगा-याखाली काही कामगार दाबल्याची भीती व्यक्त होतं आहे.

ठळक मुद्दे मागील आठवड्यात वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत कोळशाचा ढिगारा कोसळला होता.

चंद्रपूर - वेकोलि माजरीच्या जूना कुणाडा कोळसा खाणीत शुक्रवारी सकाळी मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगा-याखाली काही कामगार दाबल्याची भीती व्यक्त होतं आहे. तिघा कामागारांना बाहेर काढण्यात आले असून, गंभीर जखमी अवस्थेतील या कामगारांना नागपूरला हलविल्याची माहिती आहे. आठ वोल्वो टिप्पर, दोन ड्रिल मशीन, चार पीसी मशीन  व एक सर्व्हिसिंग गाडी दबली आहे. काही कामगारही दबल्याची शंका आहे. 

वेकोलितील ही दुसरी घटना आहे. मागील आठवड्यात याच परिसरातील तेलवासा खाणीत अशीच घटना घडली होती. वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत कोळशाचा ढिगारा कोसळला होता. यामध्ये तिथे काम करणारा डोजर ऑपरेटर निरजु झा (५५) हा दबून जागीच ठार झाला होता. या ठिकाणी काम करणारे दहा कामगार बचावले होते. मागच्या शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.  

वरती साठ ते सत्तर मीटर शेकडो टन कोळसा होता. त्यामुळे शनिवारी सकाळी ७-३० वाजता कामगाराचा मृततदेह बाहेर काढण्यात आला होता. तेलवासा खुल्या खाणीत कोळसा फेस वरून ३०० मीटर उंच आहे. याचे बनवलेले बेंच पूर्वीपासूनच धोकादायक होते. त्यामुळे गेल्या वर्षी वेकोलिच्या सतर्क विभागाच्या अधिका-यांनी खाण बंद करण्याचे आदेश दिले होते. 

टॅग्स :Accidentअपघात