शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तृतीय वर्षात प्रवेश मिळण्याचा मार्ग झाला मोकळा; कॅरी-फॉरवर्डने मिळणार विद्यार्थ्यांना प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 12:00 IST

Chandrapur : गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार कॅरी-फॉरवर्ड पद्धतीने प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कॅरी-फॉरवर्ड पद्धतीने प्रवेश मिळणार आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॅरिऑन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, यासंदर्भात सिनेट सदस्य विजय बदखल यांनी कुलगुरूंना निवेदन दिले होते.

गोंडवाना विद्यापीठाशी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक महाविद्यालय संलग्नित आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षातील काही विषय शिल्लक आहे. मात्र, विद्यार्थी द्वितीय वर्षात उत्तीर्ण झाले आहे. पहिल्या वर्षातील काही विषयांमुळे त्यांना द्वितीय वर्ष उत्तीर्ण होऊनही तृतीय वर्षात प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, आता परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. विजय खंडारे यांनी अधिसूचना काढली असून, यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. विशेष म्हणजे, ही सवलत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता लागू असल्याचेही अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. 

चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांबाबतही असेच घडले असून, त्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात येण्याची शक्यता होती. यासंदर्भात सिनेट सदस्य विजय बदखल यांनी कुलगुरूंकडे निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून कॅरिऑन देण्याची मागणी केली होती.

"विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांना कॅरिऑन देण्याची मागणी कुलगुरूंकडे केली होती. आता विद्यापीठाने निर्णय घेतल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. विद्यार्थ्यांनी कॅरी-फॉरवर्ड पद्धतीने प्रवेश मिळणार आहे." - विजय बदखल, सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरEducationशिक्षण