खरीप हंगामातील पेरणीपूर्वी मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:00 AM2020-06-07T05:00:00+5:302020-06-07T05:00:52+5:30

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक कृषी साधनांचा उपयोग करून शेतकरी आपला विकास करतात. मात्र, जिल्ह्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. अत्याधुनिक साधनांचा उपयोग शेतीसाठी करणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गाची साथ तसेच शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आशावादी दृष्टीने बघतात. मागील हंगामात विविध कीड रोगांनी पिकांवर आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले होते.

Accelerate tillage before sowing in kharif season | खरीप हंगामातील पेरणीपूर्वी मशागतीला वेग

खरीप हंगामातील पेरणीपूर्वी मशागतीला वेग

googlenewsNext
ठळक मुद्देशिवारात लगबग, बियाणे, खते, घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला आता वेग आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. यंदा कोरोनामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने पैशाची जुळवाजुळवा करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक कृषी साधनांचा उपयोग करून शेतकरी आपला विकास करतात. मात्र, जिल्ह्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. अत्याधुनिक साधनांचा उपयोग शेतीसाठी करणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गाची साथ तसेच शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आशावादी दृष्टीने बघतात. मागील हंगामात विविध कीड रोगांनी पिकांवर आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले होते.
काही तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने उत्पादनात घट झाली. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. यंदाही रबी हंगामातील कापूस व अन्य शेतमालाची विक्री होऊ शकली नाही. या वर्षी राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यात सोयाबीन पेरा वाढणार आहे. शेतीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी पीक कर्जासाठी चकरा मारत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पीक कर्जाची प्रकरणे निकाली काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पाच तालुक्यात ट्रॅक्टरचा वापर वाढला
राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, भद्रावती व नागभीड तालुक्यात खरीप हंगामाची कामे करण्यासाठी यंदा ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. बैलाचा वापर करून वखरणी, नांगणीपासून पेरणीपर्यंत तर पीक काढण्यापर्यंतची कामे केली जातात. पण, गाय, बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत नाही. हंगामासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे काही शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करून मशागतीची कामे करीत आहेत.

शेणखताचे दर वधारले
काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांकडे पाळीव जनावरांची संख्या बरीच होती. त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी चांगले बैल मिळायचे. गाशी म्हशींमुळे उत्तम दर्जाचा खत उपलब्ध व्हायचा. मात्र, हे चित्र आता बदलत आहे. पाळीव जनावरे नसल्याने शेणखत मिळणे कठीण झाले. त्यामुळे पिकांच्या पोषणासाठी शेतकरी इतरांकडून शेण खताची खरेदी करतात. त्यामुळे यंदा शेण खताचे दर वाढले आहेत.

Web Title: Accelerate tillage before sowing in kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती