बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:21+5:302021-06-11T04:20:21+5:30

बसस्थानकातील गर्दी वाढली चंद्रपूर : सोमवारपासून अनलाॅक करण्यात आले. त्यामुळे बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नात ...

About farmers to take seeds | बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

Next

बसस्थानकातील गर्दी वाढली

चंद्रपूर : सोमवारपासून अनलाॅक करण्यात आले. त्यामुळे बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून एसटीच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता पूर्ण क्षमतेने फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, नागपूर तसेच गडचिरोली येथे जाणाऱ्यांची संख्या अधिक असून या शहरांकडे महामंडळाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातीलही बसफेऱ्या वाढल्या असून, बऱ्यापैकी प्रवासी मिळत आहेत.

पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर अंधार

चंद्रपूर : शहरातील नागपूर रोड, बल्लारपूर तसेच मूल रस्त्यावरील काही पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

जप्त वाहनांचा लिलाव करावा

चंद्रपूर : महसूल प्रशासनाने मागील वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात रेती जप्त केली आहे. रेती वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने संबंधित मालकांनी दंड न भरल्यामुळे प्रशासनाकडे आहेत. त्यामुळे सदर वाहनांचा लिलाव करण्याची मागणी केली जात आहे.

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील काही भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वीज विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी शहरातील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा

चंद्रपूर : कोरोना काळामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, फ्रंट वर्करला विमा संरक्षण देण्यात आले आहे. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीच सुविधा नाही. त्यातच विमासुद्धा लागू नाही. अशा वेळीही त्यांना विविध शासकीय कार्यालयात सेवा द्यावी लागत आहे. त्यामुळेे कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही संरक्षण द्यावे, तसेच शासकीय सेवेत नियमित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

शासकीय कार्यालयांची नियमित स्वच्छता करा

चंद्रपूर : बहुतांश शासकीय कार्यालयात अस्वच्छता आहे. विशेषत: प्रशासकीय भवन परिसर सोडला तर इतर कार्यालयांमध्ये अस्वच्छता बघायला मिळते. भिंतीवर व पायऱ्यांवर तंबाखू व गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसून येते. या प्रक्रियेत जनतेसोबतच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचाही सहभाग असतो. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वाॅर्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावे

चंद्रपूर : कोरोना संकट वाढत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून लस घेणे होय. परंतु, लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. त्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रत्येक वॅार्डात लसीकरण केंद्र निर्माण करावे, अशी मागणी केली जात आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र वाढविणे गरजेचे आहे.

विविध योजनांपासून लाभार्थी वंचित

चंद्रपूर : श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनेंतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते; मात्र या योजनेचा लाभ घेताना वृद्धांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

धोकादायक पुलाला कठडे लावा

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, आता पावसाचे दिवस सुरू झाले असून, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

क्रीडा संकुल सुरू करण्याची मागणी

चंद्रपूर : येथील क्रीडा संकुलाची दुरुस्ती केली जात आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून काम संथगतीने सुरू असल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाचे काम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

मजुरांना दिलासा

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. या कामामुळे लाॅकडाऊनच्या काळात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: About farmers to take seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.