शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

एका चेंडूत जग बदलण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:07 IST

खेळावर प्रेम करा, देशाचे नावलौकीक वाढवा, कारण एका चेंडूत जंग बदलण्याची क्षमता असते, त्यामुळे क्रीडा प्रकाराकडे न्यायदृष्टीने पाहा, असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिनेअभिनेता आमिर खान यांनी केले.

ठळक मुद्देमिशन शक्तीचा थाटात शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मिशन शक्तीमुळे तरुणांना संधी मिळाली आहे. खरे म्हणजे माझे अभ्यासात मन लागत नव्हते, क्रीडा क्षेत्राची मला आवड होती. खेळातून सांघिक भूमिका बजावता येते. खेळण्याची जिद्द, हारल्याचे आत्मपरिक्षण करण्याची प्रेरणा क्रीडा प्रकारातून मिळते. शालेय अभ्यासक्रमात विषयानुसार शिक्षणासोबत कौशल्य विकसित करण्यासाठी क्रीडा प्रकाराचा समावेश करण्याची गरज आहे. खेळावर प्रेम करा, देशाचे नावलौकीक वाढवा, कारण एका चेंडूत जंग बदलण्याची क्षमता असते, त्यामुळे क्रीडा प्रकाराकडे न्यायदृष्टीने पाहा, असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिनेअभिनेता आमिर खान यांनी केले.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विसापूर येथील १५ एकर जागेच्या परिसरात अद्यावत बल्लारपूर तालुका क्रीडासंकुल उभारण्यात आले. त्याचे व माजी प्रधानमंत्री श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व प्रसिद्ध सिने कलावंत व दिग्दर्शक आमिर खान यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. यावेळी आमिर खान बोलत होते.यावेळी व्यासपिठावर राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, आमदार नाना श्यामकुळे, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, नगराध्यक्ष हरिश शर्मा, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.वाघाच्या जिल्ह्यातील युवकांना ऑलिम्पिक पदकाची संधी- सुधीर मुनगंटीवारजिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध आहे. याच जिल्ह्यातील युवकांना २०२४ ऑलिम्पिक खेळात भाग घेऊन पदक मिळविण्याची संधी मिशन शक्तीच्या माध्यामातून मिळणार आहे. लगतच्या गडचिरोली जिल्हादेखील यात सहभागी होणार आहे. मिशन शौर्यच्या माध्यमाने या भागातील आदिवासी तरुणांनी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करुन नावलौकीक मिळवला. आता मिशन शक्तीच्या रुपाने आलिम्पिक पदाला गवसणी घालण्याचे तरुणांना बळ दिले जाणार असल्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे रविवारी केले.आमीर खान यांचा पिंड देशभक्तीचा व सामाजिक बांधिलकी जोपासणारा आहे. त्यांनी भूमिका साकारलेल्या व दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामधून ते प्रतिबिंबीत होते. ‘लगान’ चित्रपट त्याचे चांगले उदाहरण आहे. कार्तिकेय गुप्ता याने जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत देशात अव्वल येवून राज्याचा लौकीक वाढविला. युपीएससीसह तत्सम स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त करुन प्रशासकीय व्यवस्थेत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून येथील तरुणाला संधी मिळावी. सैनिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या पदावर जावा. जिल्ह्याचा नावलौकीक वाढावा. मिशन शौर्य, मिशन शक्तीप्रमाणेच प्रशासकीय सेवा कार्याचेही प्रतिबंब उमटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.तालुका क्रीडा संकुलात या आहेत सुविधाबल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामावर ३९८५.६० लक्ष रुपये खर्च करण्यात येवून अद्यावत क्रीडा संकूल उभारण्यात आले. यामध्ये दोन लॉन टेनिस कोर्ट, कबड्डी मैदान, खो-खो मैदान, बॉस्केट बॉल मैदान, व्हॉलीबॉल मैदान, ४०० मीटर सिंथेटिक स्मॉर्ट धावपट्टी, जलतरण तलाव, धनुर्विद्या क्षेत्रासह ५० मुलांची राहण्याची व्यवस्था असणारे वसतिगृह, संरक्षण भिंत, बॅडमिंटन हाल, पव्हेलियन इमारत, अंतर्गत रस्ते व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा प्रेरणा देणार आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार