आरतीचा निनाद अन् ‘मोरयाचा’ जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:05+5:302021-09-13T04:26:05+5:30

राजेश खेडेकर बामणी : शुक्रवारी गणेश मंडळांसोबतच घरोघरी गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन झाले. मंगलमूर्ती गणरायाचा जयजयकार आणि ...

Aarti's echo and 'Moryacha's' shout | आरतीचा निनाद अन् ‘मोरयाचा’ जयघोष

आरतीचा निनाद अन् ‘मोरयाचा’ जयघोष

Next

राजेश खेडेकर

बामणी : शुक्रवारी गणेश मंडळांसोबतच घरोघरी गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन झाले. मंगलमूर्ती गणरायाचा जयजयकार आणि वाद्यांच्या गजरातील निनादासह गावोगावी गणपती बाप्पाचा उत्साह संचारला असून सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

गावोगावी भजन मंडळींच्या भजनाने घराघरात ताल वाद्यांचा गजर घुमू लागला आहे. भजनाची परंपरा ही खूप जुनी असून मागील दोन वर्षांपासून कोविड महामारीमुळे गणेशोत्सवात घरोघरी भजन करण्यात मज्जाव होता. आता कोरोनाचा कहर बऱ्यापैकी कमी झाला असून निर्बंधात शिथिलता मिळाली आहे. त्यामुळे घरोघरी भजन मंडळींचा गजर ऐकायला मिळत आहे. कोविडमुळे काही प्रमाणात यंदाही गणेश चतुर्थीवर मर्यादा आली असली तरी गणेशभक्तांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत नाही. उलट गणेशभक्त गणरायाच्या सेवेत मग्न झाले आहेत. लाडक्या गणपती बाप्पाचे घरी आगमन झाल्याने बाळगोपाळ तर भलतेच खूश आहेत.

120921\img-20210912-wa0005.jpg

आरतीचा निनाद अन ' मोरयाचा' जयघोष

Web Title: Aarti's echo and 'Moryacha's' shout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.