शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
2
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
3
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
4
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
6
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
7
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
8
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
9
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
12
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
13
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
14
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
15
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
16
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
17
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
18
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
19
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
20
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

अन आजीच झाली नातांची ‘आई’

By admin | Updated: January 31, 2015 01:13 IST

घरात वंशाचा दिवा नाही. मुलगी झाली, तिला मोठे करीत तिचा विवाह लावून दिला. मुलीचा आयुष्यवेल बहरून तिला दोन मुली झाल्या.

वरोरा : घरात वंशाचा दिवा नाही. मुलगी झाली, तिला मोठे करीत तिचा विवाह लावून दिला. मुलीचा आयुष्यवेल बहरून तिला दोन मुली झाल्या. आनंदाचे दिवस जात असतानाच मुलगी आणि जावयाचे निधन झाले. मातृत्व व पितृत्व हरविलेल्या दोन्ही मुलींसाठी ७५ वर्षीय आजीने ‘आई’ होत पुन्हा एकदा मातृत्वाचा प्रवास सुरू केला आहे. आपल्या नातनींसाठी या आजीची उतार वयातही संघर्ष सुरू आहे. वरोरा तालुक्यातील खेमजई गावातील विठाबाई लक्ष्मण पोहनकर (७५) असे आजीचे नाव असून पती काही वर्षापूर्वी मरण पावले. त्याआधी एका मुलीचा विवाह लावून दिला. मुलीने काजल व कोमल अशा दोन मुलींना जन्म दिला. मुली मोठ्या होत असताना आजारपणाने पिता व नंतर मातेचाही मृत्यू झाल्याने दोन्ही मुली अनाथ झाल्या. आजीने पंचात्तरी ओलांडली आहे. शेती नाही आणि कुठला व्यवसायही नाही. घरी कुणीही कर्ता पुरुष नाही. अशा स्थितीत आपल्या नातनींची जबाबदारी ७५ वर्षीय आजीने स्वीकारली आहे. काजल ९ व कोमल १३ वर्षाची असून खेमजई येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आजीच्या झोपडीमध्ये राहत आहे. मुलींना शाळेतून गणवेश, पोषण आहार, पुस्तके मिळत आहे. दोन्ही मुली सुटीच्या दिवशी शेतात जाऊन कापणी, कापूस वेचणी आदी कामे करून दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ७५ वर्षीय आजीला मदत करीत आहे. खेमजई येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत कार्यरत सात महिला स्वयं सहाय्यता बचत गटांनी या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. मात्र ही मदत त्यांचा संघर्ष कमी करण्यासाठी पुरेशी नाही. शासन निराधारासाठी अनेक उपाययोजना राबवित असताना या दोन निराधार मुलीपर्यंत शासनाची योजना येत नसल्याने अनेकांनी खंत व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)संघटनेशी सकारात्मक चर्चाचंद्रपूर : जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले आहे. हे वेतन त्वरित अदा करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पशु व्यवसायी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान जि.प. प्रशासनाने संघटनेशी सकारात्मक चर्चा केली.