शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या बोलेरोचा टायर फुटला, एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 18:07 IST

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील कुटुंब

गजानन साखरकर

घुग्घुस (चंद्रपूर) : कौटुंबिक कार्यक्रम आटोपून मारेगावकडे जाणाऱ्या बोलेरो वाहनाचा अचानक टायर फुटला. यामुळे बोलेरो वाहन अनियंत्रित होऊन दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला आदळले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूर - घुग्घुस रस्त्यावर अहमद लाँनच्या वळणावर शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. मो. युसूफ शेख, त्यांच्या पत्नी मुमताज शेख, रफिक नबी शेख व त्यांच्या पत्नी संजीदा शेख सर्व रा. मारेगाव जि. यवतमाळ अशी मृतकांची नावे असून सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. 

राजुरा येथे कौटूंबिक कार्यक्रमासाठी हे सर्व जण बोलेरो वाहनाने (क्र. एमएच २९ बीसी ६३२१) आले होते. कार्यक्रम आटोपून मारेगावला परत येत असताना पडोली-घुग्घुस रस्त्यावरील अहमद लाँनच्या वळणावर वाहनाचा समोरचा टायर फुटल्याने चालकाचे स्टेरींगवरून नियंत्रण सुटले व वाहन दुभाजकाला ओलांडून घुग्घुसकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकला (एमएच ३४ बिजी ८२५१) आदळले. यात बोलेराे वाहनाचा समोरचा भाग चकनाचूर झाला. यात मो. युसूफ शेख, त्यांच्या पत्नी मुमताज शेख, रफिक नबी शेख व त्यांच्या पत्नी संजीदा शेख यांचा जागीच मृत्यू झाला.

कटरने वाहनाचा भाग कापून काढले मृतदेह

घटनेची माहिती मिळताच पडोली व घुग्घुस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच नागरिकांचीही गर्दी उसळली. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवले. चारही जणांचे मृतदेह वाहनात फसून असल्याने कटरच्या साहाय्याने वाहनाचा काही भाग कापून मृतदेह काढावे लागले. तर वाहनाला क्रेनच्या साहाय्याने घटनास्थळावरून काढावे लागले. घटना पडोली हद्दीत येत असल्याने पडोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघातchandrapur-acचंद्रपूरYavatmalयवतमाळcarकार