शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

सणासुदीच्या काळात रुग्णांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे पालन व्हावे म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंध लादण्यात आले होते. वाहतुकीवर काही बंधने घातली. सार्वजनिक व खासगी पद्धतीने होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे नागरिकांना निर्बंधात राहून रंगपंचमीचा आनंद साजरा करता आला नाही. यंदा हे चित्र बदलले असून, नागरिकांना मनमुराद रंगांची उधळण करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून होळी, धुळवडीच्या आनंदाला नागरिक पारखे झाले होते. कोरोनापासून स्वत:ला वाचविण्याची साऱ्यांचीच धडपड दिसून आली. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने वेग पकडला. तो कालावधीही होळीच्या आसपासचा होता. अनेक व्यवहार ठप्प होते. यंदा कोरोना ओसरल्याने रंगांची बेधुंद उधळण होणार आहे. रंग, पिचकारी व मुखवटे खरेदीसाठी लहान- मोठ्यांनी चंद्रपुरातील दुकानांमध्ये मोठी गर्दी केल्याचे गुरुवारी दिसून आले. गतवर्षी कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने  होळी गुढीपाडवा, रामनवमी, चैत्र नवरात्र आणि शब-ए-बारात यासारखे सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घालती होती. सणासुदीच्या काळात रुग्णांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे पालन व्हावे म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंध लादण्यात आले होते. वाहतुकीवर काही बंधने घातली. सार्वजनिक व खासगी पद्धतीने होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे नागरिकांना निर्बंधात राहून रंगपंचमीचा आनंद साजरा करता आला नाही. यंदा हे चित्र बदलले असून, नागरिकांना मनमुराद रंगांची उधळण करता येणार आहे.

गांधी चौकात  दुकाने गजबजलीचंद्रपुरातील गांधी चौक व विविध मार्गावर यंदा रंग, पिचकारी, गुलाल व अन्य वस्तू विकणाऱ्या हंगामी दुकानांची संख्या वाढली. गांधी चौकातही अनेक दुकाने लागली आहेत. कोरोनापासून थोडी मुक्ती मिळाल्याने यंदाच्या होळीसाठी लहान मुले आणि मोठ्यांमध्येही  उत्साह दिसून येत आहे. रात्री ८ वाजतापर्यंत दुकानामध्ये गर्दी दिसून आली.

रासायनिक रंग अपायकारकबाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या व मुखवटे विक्रीसाठी आले. धूलिवंदनामध्ये रंग खेळण्यात व उधळण्यात मोठी मजा येते. मात्र, रंग वापरताना ते रासायनिक राहणार नाही, याची काळजी घ्यावी. याकडे दुर्लक्ष केल्यास हे रंग आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

सुरक्षेसाठी पोलिसांचा अलर्टहोळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणाने अलर्ट जारी केला आहे. होळी आणि रंगपंचमी हे भारतीय संस्कृतीतील विशेष सण असल्याने त्यांचे महत्त्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी रंग उडविण्याच्या कारणावरून वादविवाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले. तालुका व जिल्हास्थळी पोलीस तैनात करण्यात आले.

 

टॅग्स :Holiहोळी 2022