शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या नावे फेसबुकवर पत्र पोस्ट करून विवाहित पुरुषाने स्वत:ला संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 12:38 IST

राजोली शहरात खळबळ; विवाहबाह्य संबंधातून आले नैराश्य

मूल (चंद्रपूर) : विवाहबाह्य संबंधांतून आलेल्या नैराश्यापोटी एका विवाहित युवकाने फेसबुकवर आपल्या प्रेयसीच्या नावे पत्र पोस्ट केले आणि नैराश्यातून आपण आपले जीवन संपवित आहे, असे सांगत गळफास घेत आत्महत्या केली. गुरुवारी राजोली येथे घडलेल्या या घटनेने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.

विकास लाकडे (३८) रा. राजोली असे आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव आहे. राजोली येथील वॉर्ड नं. ५ मधील रहिवासी विकास लाकडे हा पत्नी व दोन मुलांसह राहत होता. देसाईगंज वडसा येथील एका नाट्य मंडळात ऑर्गन वाजविण्याचे तो काम करीत होता. दरम्यान, कापड व्यवसाय करणाऱ्या गावातीलच एका विवाहित युवतीशी त्याचे सूत जुळले. नाट्य मंडळात ऑर्गन वाजविण्याचे काम करताना नाटकाचा प्रयोग आणि सरावाच्या निमित्ताने विकास बहुतांशी वडसा देसाईगंज येथे राहत होता. दरम्यान कपडे विकण्याचा व्यवसाय करणारी ही विवाहित युवती खरेदीच्या निमित्ताने अनेकदा वडसा देसाईगंज येथे जात असायची.

त्यादरम्यान विकासची त्या युवतीशी वारंवार भेटी होत होत्या. भेटीचे रूपांतर प्रेमात आणि त्यानंतर विवाहबाह्य संबंधात झाले. दोघांच्याही गाठीभेटी वाढू लागल्यानंतर दोघांनीही एकत्रित राहण्याचा निर्धार केला. मात्र कुटुंब आड येत असल्याने विकास विवंचनेत असायचा. दरम्यान, दोघांच्याही विवाहबाह्य संबंधांची चर्चा गावात व कुटुंबात रंगू लागल्यामुळे विकासने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास त्याने स्वतःच्या फेसबुकवरून प्रेयसीच्या नावाने पत्र पोस्ट करून आपण नैराश्यातून जीवन संपवित असल्याचे जाहीर केले.

पोस्ट वाचून मित्रांच्या फोनचा वर्षाव

विकासने फेसबुकवर अशी पोस्ट टाकल्यामुळे त्याच्या मित्रपरिवारात खळबळ माजली. फेसबुकवरील पत्र वाचल्यानंतर अनेक मित्रांनी विकासच्या भ्रमणध्वनीवरून वारंवार संपर्क साधला. मात्र संपर्क होत नव्हता. शेवटी मोबाइलमधील लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता गावापासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर असलेल्या गंगाधर लाकडे यांच्या शेतातील झाडाला विकासने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे दिसून आले.

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी

याची माहिती पोलिस पाटील यांच्या माध्यमातून पोलिस स्टेशन मूल येथे देण्यात आली. लगेच ठाणेदार सुमित परतेकी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि पुरुषोत्तम राठोड, पोउनि गेडाम यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी राजेश शेंडे सहकाऱ्यांसह करीत आहेत.

तुर्तास या घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे. फेसबुकवरील पोस्टबाबत अद्याप तपास करण्यात आलेला नाही. तपासानंतर पुढे काय करायचे, हे ठरविले जाईल.

- सुमित परतेकी, ठाणेदार, मूल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर