शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या डोळ्यांदेखत वाघाने बालकाला उचलून नेले; काळजाचा तुकडा मिळाला, काळीज हिरावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 08:29 IST

सावली तालुक्यातील गेवरा बिटातील बोरमाळा येथे ही काळीज चर करणारी घटना घडली.

- दिलीप फुलबांधे

गेवरा (जि. चंद्रपूर) : एका चारवर्षीय बालकाला त्याच्या आईच्या डोळ्यादेखत घराच्या अंगणातून वाघाने तोंडात उचलून नेले. एकुलत्या एक मुलाला वाघ नेत असल्याचे बघून आईने जिवाच्या आकांताने टाहो फोडला. लोक धावले. रात्रभर व दिवसाही वन विभाग व पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम राबविली. अखेर आईच्या काळजाचा तुकडा सापडला खरा. मात्र, त्याचे काळीजच नव्हते.... वाघाने त्याचे ६० टक्के शरीर फस्त केले होते. सावली तालुक्यातील गेवरा बिटातील बोरमाळा येथे ही काळीज चर करणारी घटना घडली.

हर्षद संजय कारमेंगे (५) असे मृत बालकाचे नाव आहे. आई अतिक्षा ही हर्षदला शौचास लागल्याने त्याला अंगणात बसवून उभी असतानाच वाघाने अंधारातून येत हर्षदवर हल्ला केला. परिसरात वीज नसल्याने व अनावश्यक झुडपे असल्याने शोधमोहिमेत अडथळा निर्माण झाला. अखेर गुरुवारी सकाळी ६ वाजता घटनास्थळापासून चारशे मीटर अंतरावर हर्षदचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीराचा कमरेवरील भाग नव्हताच.

जेवण तयार होते; मात्र हर्षद परतलाच नाही-

चिमुकला हर्षद संजय व अतिक्षा यांचा एकुलता एक मुलगा होता. वडील मजुरीसाठी बाहेर गेले होते. आई हर्षदला घेऊन घरी होती. सायंकाळी स्वयंपाक करून हर्षदला खाऊ घालण्याची तयारी केली. तेव्हाच हर्षला शौचास जायचे असल्याने त्याने आईला सांगितले. परिस्थिती एवढी हलाखीची की, घरी वीज नाही. घरासमोरील अंगणात आईने त्याला शौचास बसविले होते. त्याचवेळी वाघाने डाव साधला.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू