शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

८५० रुपयांची खताची बॅग गेली १४०० रुपयांवर ! शेतकऱ्यांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 17:25 IST

Chandrapur : खतांचे भाव गगनाला तीन वर्षांत सोयाबीनच्या भावातही घसरण

लोकमत न्यूज नेटवर्क पळसगाव : कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्याच्या भावात दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. शेतीत लागणारा मुख्य घटक म्हणजे खत. त्यांच्या किमतीत मागील दहा वर्षांत ५५० रुपयांनी वाढ झाली आहे; परंतु तीन वर्षांत सोयाबीनचे भाव दोन हजारांनी गडगडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

शेतीमध्ये खरीप आणि रब्बी हंगामात पिके घ्यायची म्हटले तर रासायनिक खताशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. खताच्या किमती कितीही गगनाल्या भिडल्या तरी उसनवारी पैसे उचलून खते घ्यावीच लागतात. मागील दहा वर्षांच्या काळात खताची 'डीएपी'ची बॅग ८५० वरून १४०० रुपयांवर येऊन ठेपली आहे. पिकांचे भाव सातत्याने घसरतच आहेत.

शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव दिवसेंदिवस घसरताना दिसत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे आता समोरील काळात शेती करायची कशी? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे खतांचे भाव ज्याप्रमाणे वाढत आहेत, त्याच टक्केवारीनुसार शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव जर वाढला असता, तर आज एकही शेतकरी कर्जबाजारी राहिला नसता. परंतु, सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, हे देखील जळजळीत वास्तव आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल निघायला लागला की, बाहेरून माल आयात केला जातो. आयात-निर्यातीचे धोरण आजपर्यंत संपूर्णपणे शेतकरीविरोधात राबविले गेले आहे, असे समस्त शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

"गेल्या दोन ते तीन वर्षापासून सोयाबीनला अत्यल्प भाव मिळत आहे. त्यातच उत्पादनातही घट येत असल्याने खर्च निघणेही कठीण झाले आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी शेतकरी धोरणात बदल करणे काळाची गरज आहे."- लक्ष्मण इटणकर, शेतकरी, पळसगाव

"खतांच्या वाढत्या किमतींवर लगाम लावण्यात सरकार अपयशी ठरत आहे; पण सोयाबीन, कापसाचे भाव कमी करण्यात व्यवस्था यशस्वी झाली असल्याने शेतकऱ्यांचे दोन वर्षापासून कंबरडे मोडत आहे. पुढील काळात शेतमालाचा भाव असाच राहिला तरी शेती करणे कठीण आहे." - विनोद लोढे, शेतकरी, पळसगाव

टॅग्स :FertilizerखतेAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर