शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

८४० रूपयात मिळाले मौलाना आझाद गार्डन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:30 IST

शहरातील मध्यभागी असलेला मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन म्हणजे सकाळी व सांयकाळी फिरायला येणाऱ्या शेकडो नागरिकांच्या हक्काचे ‘आॅक्सिजन पॉर्इंट’ ठरले आहे. चार चकरा मारल्या की मन प्रसन्न होते आणि तरतरी येते, अशी कबुली देणाऱ्यांचा चेहरा या गार्डनची महती सांगते.

ठळक मुद्देचंद्रपुरातील आझाद गार्डनची कुळकथा : ब्रिटिश कालखंडात ‘चेंबरलेन गार्डन’ नावाने होती ओळख

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील मध्यभागी असलेला मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन म्हणजे सकाळी व सांयकाळी फिरायला येणाऱ्या शेकडो नागरिकांच्या हक्काचे ‘आॅक्सिजन पॉर्इंट’ ठरले आहे. चार चकरा मारल्या की मन प्रसन्न होते आणि तरतरी येते, अशी कबुली देणाऱ्यांचा चेहरा या गार्डनची महती सांगते. सकाळची सूर्यकिरणे इथल्या बहुगुणी झाडांच्या हिरव्याकंच पानावर उतरण्यापूर्वी पाखरांचा किलबिलाट सुरू असतो. अलीकडे वाहनांच्या वर्दळी गोंगाटात कधीकधी जीवघेणी स्तब्धता जाणवते. ‘अबुल कलाम’ ही एक पदवी आहे. त्याचा अर्थ ‘वाचस्पती’ असा होतो. बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक विचारांची तेजस्वी परंपरा पुढे नेणाºया भारतातील एका विश्वविख्यात विचारवंत व लोकनेत्याचे नाव धारण करणाºया या गार्डनच्या कुळकथेकडे मागे वळून पाहिल्यास चंद्रपूर शहराच्या इतिहासाची पाने नागरिकांमध्ये निरोगी जाणिवा निर्माण करतात.चंद्रपुरातील गोंडराजांनी तब्बल साडेसात वर्षे राज्य करून भारतीय इतिहासकारांचे लक्ष वेधले, हे खरेच आहे. पण, गोंड राजवटीने तत्कालीन समाजव्यवस्थेशी निगडीत जीवनाच्या विविध क्षेत्रातील लिखित पुरावे मागे ठेवले नाहीत. त्यामुळे गोंड राजवटीचा इतिहास म्हणजे केवळ विविध राजांच्या कालखंडांची धावती नोंद घेण्यापलीकडे लेखक पुढे जात नाही. अमुकतमुक राजाच्या इसवी सनाची जंत्री देण्यातच काहींनी धन्यता मानली. मात्र, गोंड राजांची अर्थ, समाजव्यवस्था व महसूलपद्धत कशी होती, यासारख्या विविध क्षेत्रांची माहिती मिळत नाही. ब्रिटीश सत्तेच्या आगमनानंतर चंद्रपूरच नव्हे तर देशभरात मन्वंतर सुरू झाले. ब्रिटीश सत्तेविरूद्धचा स्वातंत्र्यलढा अजरामर झाला. या लढ्यात चंद्रपूरचे योगदान काय, याची माहिती पंडित भगवती प्रसाद शुक्ल यांचा ग्रंथ देतो. आझाद गार्डनविषयी सर्वंकर्ष माहिती उपलब्ध नाही. मात्र, तु. ना. काटकर संपादित नगरपरिषद शताब्दी ग्रंथातील माहिती गार्डनचे महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेशी आहे.१९०८ रोजी बल्लारपूर-नागपूर रेल्वे सुरू झाल्यानंतर चंद्रपुरातील मुंशी अहमदखान नावाचे गृहस्थ नागपुरात गेले होते. त्यांनी नागपुरातील महाराज बाग पाहिला. त्यावरून चंद्रपुरातही अशी एखादी बाग असावी, अशी सूचना नगरपरिषदच्या १२ फेबु्रवारी १९१० रोजी नझुल सभेत केली होती. आजच्या आझाद गार्डनची प्रशस्त जागा शहराच्या मध्यभागी असल्याने अनेकांना आवडली. त्या जागेवर बाग, वाड्या व झोपड्याही होत्या. शिवाय, पक्क्या बांधणीची एक विहिर होती. या सर्व मालमत्तेची किंमत ८४० रूपये ठरविण्यात आली. नगरपरिषदने ही रक्कम देऊन सदर जागा स्वत:च्या ताब्यात घेतली. ९ सप्टेंबर १९१२ रोजी नगरपरिषदच्या सभेत या बागेला स्वीकृती मिळाली. बागेतील विविध प्रकारच्या झांडाची रूजवण, संगोपन व देखभाल करण्यासाठी नागपुरातील महाराज बागेतून एक अनुभवी माळी आणण्यात आला होता, अशी माहिती डॉ. तु. ना. काटकर यांनी ‘चंद्रपूर : स्वातंत्र्य लढ्यातील अधोरेखिते’ या ग्रंथात नोंदवली आहे. ही जागा नेमकी कुणाची, याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे चंद्रपूरकरांचा निरोगी ‘श्वास’ ठरलेल्या गार्डनवर सखोलपणे लिहिण्याची गरज आहे.धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांचे प्रेरणास्थळमौलाना अबुल कलाम आझाद (१८८८-१९५८) यांच्याकडे भूतकाळाशी वर्तमानाशी सांधेजोड करून भावी काळासाठी अचूक मार्ग शोधण्याची प्रज्ञा होती. परिस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन, कालानुरूप, कृती कार्यक्रम आणि जनआवाहन करण्याचे विलक्षण कसब ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्य सांगता येतील. जन्मभर धर्मनिरपेक्ष संमिश्र राष्ट्रवादाचे एकनिष्ठ भाष्यकार राहिले, अशी नोंद प्रसिद्ध विचारवंत डॉ. भा. ल. भोळे यांनी ‘आधुनिक भारतातील राजकीय विचार’ ग्रंथात केली आहे. आझाद यांनी लिहिलेला ‘इंडिया विन्स फ्रिडम‘ हा ग्रंथ जगभरात प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्योत्तर भारताचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांचे योगदान सर्वमान्य आहे. अशा प्रज्ञावंत मुस्लिम नेत्याचे नाव चंद्रपुरातील बागेला दिल्याने यातून तत्कालीन नगरपरिषद पदाधिकाऱ्यांची दुरदृष्टी स्पष्ट होते.असे झाले नामांतरणतत्कालीन नगराध्यक्ष माधव चेंडके यांच्या कार्यकाळात या गार्डनला अपर आयुक्त जे. टी. चेंबरलेन यांचे नाव देण्यात आले. दरम्यान, या जागेवर काळाच्या गरजेनुसार बदल करण्यात आले. परंतु, चंद्रपूरकरांना ‘चेंबरलेन गार्डन’ हे नाव पचनी पडले नाही. त्यामुळे या गार्डला म्युनिसिपल गार्डन म्हणून ओळखल्या जात होते. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर नगराध्यक्ष रामचंद्र पोटदुखे यांच्या काळात या बागेचे ‘मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन’ असे नामांतरण झाले.लोकनेत्यांचे स्मरणआझाद गार्डनमधील जैवविविधतेची उपेक्षा झाली आहे. पण, भारतीय समाज व्यवस्थेतील उपेक्षित घटकांना प्रकाशाचा मार्ग दाखविणारे क्रांतीदर्शी महात्मा जोतिबा फुले आणि जाती- धर्माच्या पलिकडचा राष्ट्रवादी विचार मांडून देशाच्या एकात्मेसाठी लढलेले सुभाषचंद्र बोस यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. एककल्ली धर्मवादी राष्ट्रवादापासून भारतीय जनतेचे नुकसान टाळण्यासाठी या महापुरूषांचा विचार सदैव प्रेरणा देणारा आहे.शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांची स्मृतिस्थळे१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडणाºया शहीद बाबूराव शेडमाके यांच्यापासून तर गोवा मुक्ती संग्रामातील शहीद भाई बाबुराव थोरात आणि १२ स्वातंत्र्य सैनिकांची स्मृतीस्थळे आहेत. सखाराम कुचिनकर, मनोहर कोतपल्लीवार, खुशालचंद्र खजांची, उत्तम खजांची, गोंविद याज्ञीक, राजेश्वर उपगलावार, आडकू श्रीगीरीवार, काशिनाथ घटे, डोनप्पा नामपल्लीवार, लक्ष्मीबाई देशमुख, कृष्णराव जोगी यांच्या कर्तृत्वाची स्मृतीस्तंभात नोंद आहे.बिटिश आयुक्तांची कथित लोकप्रियतानगरपरिषदने गार्डनची जागा ताब्यात घेण्याच्या कालखंडात अप्पर आयुक्त पदावर जे. टी. चेंबरलेन नावाचे अधिकारी कार्यरत होते. चेंंबरलेन यांच्या विकासाभिमुख दृष्टीमुळे चंद्रपूर शहरात विविध कामे झाली असावीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आस्था असावी. त्यामुळे नगरपरिषदने ८४० रूपयांत मिळविलेल्या या जागेला ‘चेंबरलेन गार्डन’ असे नाव दिले. नगराध्यक्ष माधव चेंडके यांनी विशेष सभा बोलावून ठराव मांडला होता.