शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कत्तलीसाठी जाणारी ७२ जनावरे पकडली

By admin | Updated: September 27, 2016 00:45 IST

गोहत्या बंदी कायदा लागू झाला असला तरी छुप्या मार्गाने जनावरांची वाहतूक करून कत्तलीसाठी मोठ्या शहरात नेली जात आहेत.

गावकऱ्यांची सतर्कता : ४ ट्रक जप्त, चिमूर पोलिसांची कारवाईचिमूर : गोहत्या बंदी कायदा लागू झाला असला तरी छुप्या मार्गाने जनावरांची वाहतूक करून कत्तलीसाठी मोठ्या शहरात नेली जात आहेत. नागभीडवरुन चार ट्रकमध्ये ७२ जनावरे कत्तलीसाठी नेली जात असताना खडसंगीवासीय नागरिकांच्या सतर्कतेने ट्रक पकडून चिमूर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई सोमवारी सकाळी ५ वाजता करण्यात आली.गोहत्याबंदी कायदा असला तरी या कायद्याला बगल देत काही भागात आजही अवैधरित्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक सुरू आहे. नागभीड येथून चार ट्रकमध्ये ७२ जनावरे भरुन अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची माहिती चिमूर पोलिसांना मिळताच खडसंगी येथील खडसंगी-कोरा-वरोरा मार्गावर नाकाबंदी करून जनावरे भरलेले चारही ट्रक पकडण्यात पोलिसांना यश आले. चिमूर पोलीस खडसंगीपर्यंत येण्यास विलंब होत असल्याने गावकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर ट्रक आडवा करून जनावरांना नेणाऱ्या वाहनाना अडविले. तेव्हापर्यंत पोलीस ताफा घेऊन पुुढील कारवाई केली. ट्रक एम.एच. २८ डी-८७८२, एम.एच. ०४- सीआर- ८१९३, एमएच ३१ सीक्यू- ७२४५ व एमएच २७ एक्स ६१३३ या क्रमांकाचे ट्रक जप्त करण्यात आले असून जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत. चार ट्रकांची अंदाजे किंमत ४८ लाख तर जनावरांची किंमत अंदाजे ७ लाख ४० हजार असा ऐवज चिमूर पोलिसांनी जप्त केला. यामध्ये ट्रक डायव्हर हरिदास चौखे, मंगेश चन्नाने सिंदेवाही, कसीम खान मुस्तारविन खान व शफी शेख अब्दुल गफ्फार रा. नागभीड यांना अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार दिनेश लबडे, मनोहर नाले, माकोडे, बोढे, सरोदे, बैठा व कैलाश वनकर यांनी केली. पकडलेल्या जनावरांना ग्रामपंचायत खडसंगी व बंदर (शिवापूर) येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)