खरिपासाठी लागणार ६८ हजार क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:35 PM2018-05-22T23:35:09+5:302018-05-22T23:35:37+5:30

खरीप हंगाम तोंडावर असून मशागतपूर्व कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे.

68 thousand quintals of seed will be required for Kharif | खरिपासाठी लागणार ६८ हजार क्विंटल बियाणे

खरिपासाठी लागणार ६८ हजार क्विंटल बियाणे

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची लगबग : सद्यस्थितीत ४ हजार ४६९ क्विंटल बियाणे उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खरीप हंगाम तोंडावर असून मशागतपूर्व कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे. यावर्षीच्या खरिप हंगामासाठी सार्वजनिक व खासगी अशी ६८ हजार ८०५.३० क्विंटल बियाण्यांची मागणी असून सध्यास्थितीत जिल्ह्यात ४ हजार ४६९ क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. उर्वरित बियाण्यांचा साठा लवकर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर खत व बियाणे मिळतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकºयांची बियाणे व खतासाठी धावपळ सुरू होते. याच संधीचा फायदा घेत अनेक कृषी केंद्र संचालक बियाणे व खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करीत असतात. त्यामुळे शेतकºयांची लूट होत असल्याचा प्रकार दरवर्षी बघायला मिळते. यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत यावर्षी बियाणे व खताची टंचाई निर्माण होवू नये, यासाठी नियोजन केले आहे.
यावर्षीच्या खरिप हंगामासाठी सार्वजनिक स्वरूपात १९ हजार ९२३ क्ंिवटल बियाण्यांची मागणी आहे. तर खासगी स्वरूपात ४८ हजार ८८२ क्विंटल अशी ६८ हजार ८०५.३० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. यापैकी सार्वजनिक मागणीनुसार १५९९ क्विंटल तर खासगी मागणीनुसार २८७० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यामध्ये भात, ज्वारी, तूर, कापूस, मुंग, उडीद, सोयाबीन, तीळ, कापूस, कापूस बीटी व इतर बियाण्यांचा समावेश असला तरी सध्या भात व सोयाबीन बियाणेच उपलब्ध झाले आहेत. लवकरच सर्व बियाणे उपलब्ध होतील, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी
शेतकरी उसनवारी किंवा कर्ज काढून बियाण्यांची खरेदी करतात. मात्र अनेकांचे बियाणे पेरणी केल्यानंतर उगवत नाही. यात पूर्ण खर्च पाण्यात जातो. अशा वेळी काही शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करतात. मात्र निकृष्ठ दर्जाचे बियाणे विकणाऱ्यावर कारवाई होत नाही. शेतकºयाला मात्र नाईलाजास्तव दुसºयांदा बियाणे खरेदी करून पेरणी करावी लागत असते. त्यामुळे कृषी विभागाने विक्रीस असलेल्या बियाण्यांची आधीच चौकशी करून त्या बियाण्यांची उगवण क्षमता आहे किंवा नाही, हे तपासूनच विक्रीचे आदेश द्यावे, अशी मागणी आहे.

Web Title: 68 thousand quintals of seed will be required for Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.