शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

एका जागेसाठी ६८ उमेदवार रांगेत होमगार्डच्या जागा ९१; अर्ज ६२००

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 12:40 IST

Chandrapur : गृहरक्षक दलात राज्यात एकूण ९ हजार ७०० पदांसाठी भरती

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलात राज्यात एकूण ९ हजार ७०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. चंद्रपुरात रिक्त असलेल्या ९१ पदांसाठी सहा हजार २०० उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज आले होते. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एका जागेसाठी किमान ६८ उमेदवार रांगेत आहेत. जिल्ह्यातील होमगार्डची शारीरिक क्षमता चाचणी पार पडली आहे. आता केवळ चारित्र पडताळणी व वैद्यकीय पडताळणी शिल्लक आहे. त्यानंतर हे होमगार्डच्या सेवेसाठी पात्र ठरणार आहेत. 

कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना मदत करण्यासाठी होमगार्ड संकल्पना सुरू करण्यात आली. पोलिसांना मदत करण्याबरोबर आपत्कालीन स्थितीत होमगार्ड उपयुक्त ठरत असल्याने पोलिसांना चांगलीच मदत होत आहे. पोलिस भरतीत अपयशी ठरलेले अनेक तरुण गृहरक्षक दलात काम करतात. मागील महिन्यात ९१ होमागार्डच्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी तब्बल सहा हजार २०० अर्ज आले. 

कोणती कागदपत्रे आवश्यक? शैक्षणिक कागदपत्रे, वय, जात पुराव्याचे संच, आयकार्ड आदी कागदपत्रे गरजेची होती. शारीरिक क्षमता चाचणी पूर्ण झाली असून केवळ चारित्र पडताळणी, वैद्यकीय पडताळणी शिल्लक आहे.

केवळ चारित्र पडताळणी शिल्लक होमगार्डची शारीरिक क्षमता चाचणी २२ ते २४ ऑगस्ट या कालावधीत चंद्रपुरात पार पडली. आता केवळ चारित्र व वैद्यकीय पडताळणी शिल्लक आहे. लवकरच ते सेवेत रुजू होणार आहेत. 

महिलांसाठी किती जागा आरक्षित? गृहरक्षक दलात राज्यात एकूण ९ हजार ७०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ९१ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात महिलांसाठी ४३ जागा राखीव होत्या.

जिल्ह्यात होमगार्डच्या ९१ जागा गृहरक्षक दलात राज्यात एकूण ९ हजार ७०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ९१ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात महिलांसाठी ४३ जागा राखीव होत्या.

सहा हजार २०० अर्ज चंद्रपूर जिल्ह्यात होमगार्डच्या ९१ जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. जिल्ह्याभरातून तब्बल सहा हजार दोनशे अर्ज आले. २२ व २४ ऑगस्ट यादरम्यान त्यांची शारीरिक चाचणीही पार पडली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर