शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

वाळू घ्यायची 600 रुपये ब्रासने अन् विकायची सात हजाराने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

वाळूचा लिलाव न झालेले घाट बरेच असल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अवैध वाळूचोरी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. वाळूचा न झालेला लिलाव वाळूचोरांच्या पथ्यावर पडला आहे. जिल्ह्यात विविध नद्यांमधील वाळू लिलावातून तीन वर्षांत महसूल प्रशासनाला ५० कोटींपेक्षा महसूल मिळाला. गेल्या वर्षीपासून वाळूचा लिलाव न झाल्याने जिल्ह्याचा महसूल बुडाला आहे. जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू खननाविरूध्द पथक तयार केले. महसूल प्रशासन तालुका स्तरावर सक्रीय असले तरी वाळू तस्करी थांबली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सध्या बांधकामे जोरात सुरू आहेत. मात्र, शासनाने वाळूचा प्रश्न अजूनही सुटला नाही. त्यामुळे ६०० रुपये ब्रासने घेतलेली वाळू ७ हजारांत विकली जात आहे. वाळू मिळाली नाही तर बांधकाम थांबेल, या धास्तीने अनेकांना चढ्या दराने वाळू घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे जिल्ह्यातील सध्याचे चित्र आहे.राज्य शासनाने वाळूबाबत नवीन धोरण तयार केले. त्यानुसार काही वाळू घाटांचे लिलाव झाले. मात्र, वाळूचा लिलाव न झालेले घाट बरेच असल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अवैध वाळूचोरी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. वाळूचा न झालेला लिलाव वाळूचोरांच्या पथ्यावर पडला आहे. जिल्ह्यात विविध नद्यांमधील वाळू लिलावातून तीन वर्षांत महसूल प्रशासनाला ५० कोटींपेक्षा महसूल मिळाला. गेल्या वर्षीपासून वाळूचा लिलाव न झाल्याने जिल्ह्याचा महसूल बुडाला आहे. जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू खननाविरूध्द पथक तयार केले. महसूल प्रशासन तालुका स्तरावर सक्रीय असले तरी वाळू तस्करी थांबली नाही.

 वाळू कंत्राटदार मालमाल वाळू तस्करीत कंत्राटदार मालामाल होत आहेत. चंद्रपुरात मूल तालुक्यातून वाळूचा सर्वाधिक पुरवठा होतो. कंत्राटदार रात्रीच वाळू पुरवठा करतात. त्यासाठी त्यांनी काही एजंट नेमले आहेत.

लिलाव न होता वाळू उपसा जोरात- अनेक वाळूमाफिया उपसा करून बाहेर ढीग करतात. तो ढीग महसूल प्रशासनाच्या लक्षात आल्यावर अधिकृतरीत्या लिलाव केला जातो. - ‘ती’ वाळू अधिकृत केली जाते. तर त्या वाळूच्या परमिटवर नदीपात्रातील वाळू ही मोठ्या प्रमाणात उचल केली जाते. असे करणारे काही ठिकाणी रॅकेटच कार्यरत आहे. लिलाव न होता वाळू उपसा जोरात सुरू आहे.

भाव कधी बदलेल याच नेम नाही

वाळूचा लिलाव झालेल्या घाटांची संख्या कमी आहे. त्यामुळे चोरटे याचा गैरपायदा घेत आहेत. चंद्रपूर शहरातील एखादा नागरिकाने वाळूची मागणी केली तर रात्री २ वाजताच्या सुमारास ती टाकली जाते. त्यातही या वाळूचा भाव कधी बदलेल हे सांगता येत नाही.

प्रशासनही हतबल- काही वाळूचोर तेथील ठेक्यावर रॉयल्टी भरून पावती मिळवतात आणि ती वाळू स्थानिक ठिकाणी भरतात. महसूल प्रशासनाकडू कारवाई होते. पण, वाळूचोरीच्या घटना चंद्रपूर जिल्ह्यात वाढत आहेत. त्यामुळे महसूल प्रशासन वाळूचोरीने हतबल झाले आहे.

कोट्यवधींचा महसूल बुडतोय लिलाव न झाल्याने नदी व नाल्यांचे पात्र रिकामे होत आहे.  ग्रामस्थ वाळूचोरीला अटकाव करण्याचा प्रयत्न करतात. पण, त्यांना वाळूचोरांकडून धमक्या येतात. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम महसूल बुडीवर होत आहे. 

 

टॅग्स :sandवाळू