शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

रोहयोने दिले ५८ हजार मजुरांच्या हाताला काम

By admin | Updated: May 18, 2016 00:45 IST

बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली.

जिल्ह्याचा दुसरा क्रमांक : तीव्र उन्हामुळे कामांवर परिणाम परिमल डोहणे चंद्रपूरबेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेमुळे जिल्ह्यातील तब्बल ५८ हजार ४२९ मजुरांच्या हाताला काम मिळाले असून ही कामे उपलब्ध करून देण्यात चंद्रपूरचा राज्यात दुसरा क्रमांक लागला आहे.चालु वर्षात जिल्ह्यात विविध गावांमध्ये शेकडो कामे सुरू आहेत. यात विहिरींचे बांधकाम, तलाव खोलीकरण, शेततळे बांधकाम, गाळ उपसा, रस्त्यांचे बांधकाम अशी कामे केली जात आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे राहत नसल्याने शेकडो ग्रामीण मजूर कामाच्या प्रतीक्षेत असतात. अनेक नागरिक रोजगारासाठी इतर ठिकाणी स्थलांतर होतात. अशातच रोहयोची कामे मजुरांना दिलासा देणारी ठरली आहेत. कामाची मागणी केल्यास मजुरांना प्रशासनाकडून रोहयोच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून दिली जात आहेत. सध्या जिल्ह्यात शेकडो कामे सुरू असून या कामांवर ५८ हजार ४२९ मजूर काम करीत आहेत. मात्र सध्या कडक उन्ह तापत असल्याने काही ठिकाणी कामे बंद आहेत.आता मिळणार १५० दिवस कामराज्यात जिल्ह्याचा दुसरा क्रमांकरोहयोचे कामे उपलब्ध करून त्या कामांवर मजुर उपस्थितीच्या बाबतीत चंद्रपूर जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक आहे. गोंदिया जिल्हा आघाडीवर असून त्या जिल्ह्यात ६८ हजार ६६२ मजुरांची उपस्थिती आहे. तर रायगड जिल्हा पिछाडीवर असून तिथे केवळ ३०३ मजूर काम करीत आहेत.‘मागेल त्याला काम’ असे ब्रिद असलेल्या या योजनेच्या जॉबकार्डधारकांना शासन नियमानुसार १०० दिवस काम देण्यात येत होते. परंतु यावर्षी दुष्काळी वर्ष जाहीर करून केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने १०० दिवसांऐवजी १५० दिवस काम देण्यात येणार आहे. मजुरीचे दर वाढलेरोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना यापूर्वी १८० रुपये मजुरी दिली जात होती. यावर्षी केंद्र शासनाने मजुरीचे दर वाढविले असून १९२ रुपये मजुरी दिली जात आहे.