शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

बिगर शेती सहकारी पतसंस्थेत ५२ लाखांचा गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 13:06 IST

लेखा परीक्षणातून ठपका : सहव्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील राजोली व मूल येथील एल्गार बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ५२ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी सहव्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना सोमवारी (दि. ५) उघडकीस आली. सहव्यवस्थापक रवींद्र कोल्हटवार, लिपिक सुशील श्रीमंतवार व दैनिक अभिकर्ता यश कुमार लेनगुरे अशी आरोपींची नावे आहेत. लेखा परीक्षणातून गैरव्यवहार उघडकीस आल्याने ही कारवाई झाली. 

एल्गार महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची राजोलीत मुख्य कार्यालय व मूल येथे शाखा सुरू झाली होती. भविष्यातील सुरक्षा म्हणून गुंतवणूकदारांनी दैनिक, आवर्ती, मुदत व बचतठेव अशा विविध योजनांमध्ये लाखोंची गुंतवणूक केली. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत ग्राहकांनी गुंतवणूक केलेली रक्कम बनावट स्वाक्षरीद्वारे परस्पर वळविण्यात आली. दैनिक वसुलीचे ५१ लाख ७५ हजार ४२० रुपये व अन्य असा एकूण ५२ लाखांचा अपहार केल्याचे उपलेखा परीक्षक मनीष अमरसिंग जाधव यांच्या लेखा परीक्षणातन उघड झाले जाधव यांनी मूल पोलिसात तक्रार केली. त्यावरून सहव्यवस्थापक रवींद्र कोल्हटवार लिपिक सशील श्रीमंतवार व दैनिक अभिकर्ता यश कुमार लेनगुरे आदी तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ४०९ ४२०. ४६७ ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला. पुढील तपास एपीआय अविनाश मेश्राम करीत आहेत

एक वर्षापासून पतसंस्था कुलूपबंदएल्गार बिगरशेती सहकारी पतसंस्था एक वर्षापासून कुलूपबंद आहे. संचालक मंडळाने सहायक निबंधकांकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली होती. त्या तक्रारीवरून सहायक निबंधकांनी पतसंस्थेचे लेखापरीक्षण केले. यात ५२ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले.

ठेवीदार आर्थिक संकटात

  • पतसंस्थेचे खातेदार व ठेवीदारांना पैसे परत देण्यास टाळाटाळ होत असल्याने ठेवीदार आर्थिक संकटात सापडले. पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवीदारांनी सर्वात आधी केला होता. मात्र, कारवाई झाली नाही.
  • अनेकांनी मोठ्या विश्वासाने पैसे गुंतवणूक केली. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. हे पैसे परत कधी मिळणार, याकडे ठेवीदारांच्या नजरा लागल्या आहेत.

थकबाकीदारांकडून होणार वसुली।लेखा परीक्षकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी २७ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल केला. पण ही बाब उघडकीस येऊ दिली गेली नाही. यामागचे कारण काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, थकीत कर्ज खातेदारांवर प्रशासकीय कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या. कर्जधारकाकडील थकीत रक्कम वसूल करण्यात येईल.

"एल्गार बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या तक्रारीवरून चौकशी पूर्ण झाली आहे. यामध्ये सहव्यवस्थापक, लिपिक व दैनिक अभिकर्ता दोषी आढळले. पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे."- लक्ष्मीकांत वानखेडे, दुय्यम निबंधक, सहकारी संस्था, मूल 

टॅग्स :fraudधोकेबाजीchandrapur-acचंद्रपूर