शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

87 हजार विद्यार्थ्यांसाठी 5 कोटी 22 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2022 05:00 IST

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शाळांकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात मिशन गरुड झेड हा उपक्रमही सुरू करण्यात आला. वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकही वितरण करण्यात येणार असून, शाळा समितीच्या निर्णयानुसार मोफत दोन गणवेशही दिल्या जाणार आहे. एका गणवेशासाठी ३०० रुपयांप्रमाणे दोन गणवेशासाठी सहाशे रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खर्च केले जाणार आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकट काळात काही दिवस सोडले तर तब्बल दोन वर्ष शाळा बंद होत्या. दरम्यान, नव्या शैक्षणिक वर्षात नियमित शाळा सुरू होणार असून, जिल्ह्यातील तब्बल ८७ हजार ६७ विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन मोफत गणवेश दिले जाणार आहे. यासाठी जिल्ह्याला ५ कोटी २२ लाख ४० हजार २०० रुपयांचा निधीही मंजूर झाला असून, शाळांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळेयावर्षी गणवेश घेण्याचा पालकांचा आर्थिक ताण कमी होणार आहे.इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये जिल्हा परिषद शाळा कुठेही मागे राहू नये यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शाळांकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात मिशन गरुड झेड हा उपक्रमही सुरू करण्यात आला. वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकही वितरण करण्यात येणार असून, शाळा समितीच्या निर्णयानुसार मोफत दोन गणवेशही दिल्या जाणार आहे. एका गणवेशासाठी ३०० रुपयांप्रमाणे दोन गणवेशासाठी सहाशे रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खर्च केले जाणार आहे.गणवेशाचे शाळांमध्ये पैसे पोहचले असून शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थ्यांना गणवेशासाठी निर्णय घेणार आहे. पैसा खर्च करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांना आहे.

८७०७६ विद्यार्थ्यांना दोन गणवेश- जिल्हा परिषद शाळांतील ८७ हजार ७६ विद्यार्थ्यांना शाळा समिती ठरवतील त्या रंगाचा गणवेश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना  तिनशे रुपयांप्रमाणे प्रत्येकी तीनशे रुपये दोन गणवेश दिले जाणार आहे.

या विद्यार्थ्यांनाही हवाजि.प. शाळांतील इतर मार्गासवर्गीय, ओपन आणि भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याची मागणी केली जात आहे.

कोणाला मिळणार गणवेशजिल्हा परिषद शाळेतील १ ते ८ वी पर्यंतच्या सर्व मुली,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिल्या जातो.

बालमनावर परिणामएकाच वर्गातील काही विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिल्या जात असताना खुला आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश दिल्या जात नाही. त्यामुळे जाती-जातीबद्दल बालमनावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गणवेश वितरण करताना चिमुकल्यांना उत्तर देताना शिक्षकांनाही मोठा ताण येतो. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी