शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

घरी परतत असताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

By राजेश भोजेकर | Updated: April 17, 2023 17:41 IST

मध्यप्रदेशातील नेवरागावाजवळ घडला अपघात

चंद्रपूर : आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी चारचाकी वाहनाने जात असताना एकाच कुटुंबातील तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना दि. १६ ला पहाटेच्या सुमारास नेवरागावाजवळ घडली. अपघातातील परिवार श्रीनगर कॉलनी ब्रम्हपुरी येथील सेवानिवृत्त एस्टी चालक विजय बडोले यांचा असून अपघातात त्यांची पत्नी कुंदा बडोले (५२), मुलगा गिरीश बडोले (३२), व विवाहित मुलगी मोनाली बडोले (चौधरी) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर विजय बडोले (६२) यांचा गोंदियातील रुग्णालयात आज दि. १७ ला मृत्यू झाला. इतर दोन चिमुकले व सून जखमी असून गोंदिया येथे उपचार सुरू आहेत.

ब्रम्हपुरी येथील श्रीनगर कॉलनीतील रहिवासी सेवानिवृत्त बस चालक विजय गणपत बडोले हे आपल्या परिवारासह स्वतःच्या चार चाकी वाहनाने मध्यप्रदेशातील  बैहर येथील कुमादेही येथे जात असताना किरणापुर नजिक नेवरागाव कला येथे  एका दुचाकी वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा तोल गेल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन चारचाकी वाहनाने धडक दिली.

या भीषण अपघातात त्यांची पत्नी कुंदा बडोले, मुलगा इंजी. गिरीश बडोले, विवाहित मुलगी मोनाली चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनचालक सेवानिवृत्त विजय बडोले, यांचा गोंदिया येथे उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. सून बबिता बडोले, दोन लहान चिमुकले नातवंड गंभीर जखमी असून त्यांच्यावर गोंदिया येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एकाच परिवारातील एकूण सहा जण प्रवास करीत होते. मृतकाचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले.  ब्रह्मपुरी तालुक्यातील पहिली घटना आहे. मृतकांवर काल रात्री ११.३०. वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकाच कुटुंबातील चौघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघातchandrapur-acचंद्रपूर