ब्रह्मपुरी : तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच काढण्यात आली. त्यांपैकी ३८ ग्रामपंचातीवर महिला राज येणार असल्याचे आरक्षणावरुन दिसून येत आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील अनु.जाती करीता सानगाव, अऱ्हेरनवरगाव, दिघोरी, निलज (महिला), मुडझा (महिला), सोंडो (महिला), तोरगाव खुर्द (महिला), बेटाळा (महिला), किटाळी, सुरबोडी, आवळगाव (महिला).अनु.जमाती करीता मरारमेंढा, अड्याळ (जाणी), चौगाण (महिला), हळदा (महिला), तोरगाव बुज (महिला), खेडमक्ता. नागरिकांचा मागासप्रवर्ग - चिचगाव, कुडेसावली (महिला), लाखापूर, माथर, बोरगाव, चांदगाव, सोरडी (महिला), चकबोथली, रणमोचन, तळोधी खुर्द (महिला), रुई, बल्लारपूर माल (महिला), उदापूर (महिला), वायगाव (महिला), मालडोंगरी, खरकाडा (महिला), खंडाळा, काणेता (महिला), बोढेगाव (महिला), भालेश्वर (महिला).सर्वसाधारण गटासाठी झिलबोडी, तुल्हानमेंढा, कोधूळा (महिला),पारडगाव, किन्ही, जूगनाळा, चांदली (महिला), नान्होरी, कन्हाळगाव (महिला), नांदगाव जाणी (महिला), रानबोथली, पिंपळगाव (महिला), चिखलगाव (महिला), लाडज (महिला), हखोली (महिला), चिंचोली बुज (महिला), सावलगाव (महिला), सोनेगाव (महिला), गांगलवाडी, गोगाव, बरडकिन्ही (महिला), आक्सापूर (महिला), मांगली, जवराबोडी मेंढा, मुई (महिला), मेंडकी, रामपूरी, वांद्रा (महिला), कोसंबी खडसमारा,बोळदा, कळमगाव, एकारा (महिला), भूज तुकूम, बेलगाव (महिला), कोल्हारी, चिंचखेडा (महिला), काहाली आदी ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले असून तब्बल ३८ महिला निरनिराळ्या प्रवर्गातून सरपंचपदी आरुढ होणार आहेत. आॅगस्ट- सप्टेंबर महिन्यात निवडणूका होणार असल्याने गावखेड्यात राजकीय आखाडे बांधण्यात कार्यकर्ते मशगुल असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात ३८ महिलांना सरपंचपदाची लॉटरी
By admin | Updated: April 1, 2015 01:07 IST