शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मनपा निवडणुकीसाठी ३६७ मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 00:43 IST

१९ एप्रिलला होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

भरारी पथके ठेवणार लक्ष : ३,०२०५७ मतदार बजावणार मतदानाचा हक्कचंद्रपूर : १९ एप्रिलला होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवस्था केली असून राज्याचे प्रधान सचिव यांनी या निवडणूक प्रक्रियेचा आढावाही घेतला आहे. मतदान प्रक्रियेसाठी शहरात ३६७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात तब्बल २६ केंद्र संवेदनशिल असून पाच भरारी पथक सातत्याने या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे.ए. साहरिया यांनी आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.चंद्रपूर शहरात सध्या मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. १९ एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर २१ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी आज मनपाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर शहराची लोकसंख्या तीन लाख २० हजार ३७९ आहे. यातील मतदारांची संख्या तीन लाख २ हजार ५७ असून यात एक लाख ५४ हजार ७४७ पुरुष तर एक लाख ४७ हजार ३०१ महिला मतदार आहेत. १४१ इमारतींमध्ये या मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मतदारांसाठी सर्व सोईसुविधा असणार आहे. याशिवाय दिव्यांगाकरिता रॅम्पची विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३६७ केंद्रांसाठी ४४० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय पाच भरारी पथके, १२ चेक पोस्ट असणार आहेत. भरारी पथके सातत्याने पूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील. १२ ठिकाणी नाकाबंदी करून २४ तास वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.निवडणुकीदरम्यान गैर प्रकाराचा अवलंब होणार नाही. तसेच कुठेही गोंधळ व संशयाची स्थिती निर्माण होणार नाही, यासाठी भरारी पथकासह पोलीस विभाग दक्ष राहणार आहे. भरारी पथके व्यवस्थितपणे काम करताहेत किंवा नाही याची वारंवार पाहणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी वनविभाग व आपातकालीन विभागाचीही मदत घेतली जाणार आहे. जिल्हयाच्या चहुबाजूस वनक्षेत्र आहे. या वनांचा आधार घेत निवडणुकीत गैरप्रकार होऊ नये यासाठी वनविभाग आपले स्वतंत्र तपासणी नाके लावून तपासणी करणार आहेत, अशी माहितीही सहारिया यांनी यावेळी दिली.पत्रकार परिषदेला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अप्पर पोलीस अधिक्षक हेमराज राजपूत आदी उपस्थित होते.आयुक्तांनी घेतल्या तीन बैठकाराज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज रविवारी निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेताना लागोपाठ तीन बैठका घेतल्या. पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सहारिया यांनी सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान स्लिपचे १०० टक्के वाटप करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यानंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी पक्षाच्या वतीने दक्षता घेणे आवश्यक असलेल्या बाबी आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. निवडणूक प्रक्रिया अधिक चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. त्यानंतर तिसरी बैठक प्रसारमाध्यमांसोबत आयोजित करण्यात आली.व्हीव्हीपॅटची व्यवस्था नाहीइव्हीएम मशीनबाबत मागील काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र या मशीनमध्ये घोळ होणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी स्पष्ट केले. काही जणांनी इव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र एकाच मशीनमध्ये चार जणांना मतदान करायचे असल्याने व्हीव्हीपॅटची व्यवस्था यावेळी शक्य नसल्याचेही सहारिया यांनी सांगितले. ही व्यवस्था २०१९ पर्यंत अमलात येण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.