शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३२८ प्रगणक व २२ पर्यवेक्षक करणार सर्वेक्षण, मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला सुरुवात

By परिमल डोहणे | Updated: January 23, 2024 15:14 IST

प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.

सावली (चंद्रपूर ) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुला प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला मंगळवारपासून सुरुवात झाली असून ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाकरिता तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, शिक्षक व इतर कर्मचारी मिळून एकूण ३२८ प्रगणक आणि २२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यासंदर्भात तालुकास्तरावर सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनात दि. २१ व २२ जानेवारी रोजी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रगणक आणि पर्यवेक्षकांना आयोगाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. या सर्वेक्षणात तालुक्यातील सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबासाठी प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. हे सर्वेक्षण मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे.सर्वेक्षण करण्याकरिता प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. ते प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यांना तालुक्यातील जनतेने सहकार्य करावे, माहिती देताना मनात कुठलीही शंका निर्माण करू नये, कुटुंबाची सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे.परिक्षित पाटील,तहसीलदार तथा तालुका नोडल अधिकारी सावली.