शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२९ फेब्रुवारीला ३० बाळांचा जन्म, थेट २०२८ मध्ये पहिला वाढदिवस!

By परिमल डोहणे | Updated: March 2, 2024 18:56 IST

लिप वर्षात बाळाचा जन्म २९ फेब्रुवारीला झाला की, आई-वडिलांसह सर्वांनाच मोठा आनंद होतो.

चंद्रपूर: लिप वर्षात बाळाचा जन्म २९ फेब्रुवारीला झाला की, आई-वडिलांसह सर्वांनाच मोठा आनंद होतो. कारण २९ फेब्रुवारी ही चार वर्षांतून एकदाच येत असते. यंदाच्या लिप वर्षात जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा तर उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० बाळांचा जन्म झाला आहे. यात १८ मुले व आठ मुलींचा समावेश आहे. या सर्वांनाच आता वाढदिवस साजरा करण्यासाठी २०२८ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वर्षातील फेब्रुवारी महिन्याव्यतिरिक्त इतर महिने ३० किंवा ३१ दिवसांचे असतात. तर फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असतो. यंदाचे २०२४ हे लिप वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा होता. चार वर्षांतून एकदाच असा दिवस येत असतो. त्यामुळे २९ फेब्रुवारीला जन्मलेल्या कुटुंबांचा आनंद द्विगुणित होत असतो. जिल्ह्यात २९ फेब्रुवारीला ३० बाळांचा जन्म झाला आहे. यांना आता थेट २९ फेब्रुवारी २०२८ मध्ये वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळणार आहे. बरेचदा २९ फेब्रुवारीला जन्मलेले काही जण वर्षांची प्रतीक्षा न करता त्यांचा वाढदिवस २८ फेब्रुवारी किंवा १ मार्चला साजरा करतात.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दहा बालकांचा जन्मचंद्रपूर शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात २९ फेब्रुवारी २०२४ रोजी १० बालकांचा जन्म झाला आहे. यामध्ये सहा मुले व चार मुलींचा समावेश आहे. लिप वर्षाला जन्म झाल्यामुळे सर्वच आई-वडिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

ग्रामीण रुग्णालयात २० बालकांचा जन्मचंद्रपूर जिल्ह्यात चार उपजिल्हा रुग्णालय, दहा ग्रामीण रुग्णालय, ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र तर ३३९ उपकेंद्र आहेत. यामध्ये २९ फेब्रुवारी २०२४ ला २० बालकांचा जन्म झाला आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर