शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

चंद्रपूरातील २८५ उमेदवारांना अखेर मिळणार शासकीय नोकरी ! 'अशी' आहेत नोकरीची पदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:55 IST

Chandrapur : जिल्ह्यातील अनुकंपाधारकांच्या नियुक्तीचा प्रश्न न सुटल्याने संबंधित कुटुंबांची अनेक वर्षापासून प्रतीक्षा सुरू होती. अशा पात्र कुटुंबांतील व्यक्तीला नोकरीत सामावून घेण्याचा विषय राज्य शासनाने १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत समावेश केला. अंमलबजावनीने कुटुंबांना न्याय मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनुकंपाधारकांच्या नियुक्तीचा तिढा कायम होता. राज्य शासनाने १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपाधारकांचाही समावेश केल्याने जिल्ह्यातील २०२ अनुकंपाधारक आणि ८३ सरळसेवा भरती उमेदवार, अशा एकूण २८५ जणांची शासकीय नोकरीसाठी निवड झाली. राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते शनिवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात संबंधित उमेदवारांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील अनुकंपाधारकांच्या नियुक्तीचा प्रश्न न सुटल्याने संबंधित कुटुंबांची अनेक वर्षापासून प्रतीक्षा सुरू होती. अशा पात्र कुटुंबांतील व्यक्तीला नोकरीत सामावून घेण्याचा विषय राज्य शासनाने १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत समावेश केला. अंमलबजावनीने कुटुंबांना न्याय मिळाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाची तत्परता

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आणि अधीक्षक नरेश बहिरम यांच्या मार्गदर्शनात ३ सप्टेंबर २०२५ रोजी अनुकंपाधारकांचा मेळावा आणि १३ सप्टेंबर २०२५ रोजी सरळसेवा अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. यात उपलब्ध पदे, शैक्षणिक अर्हता, पात्रता, वेतनश्रेणी, कामाचे स्वरूप, पदोन्नती संधी, विशेष प्रावीण्य, तंत्रज्ञ, शासकीय सेवेची जबाबदारी व कर्तव्य आदी माहिती दिली. या समुपदेशनाने शासकीय नोकरीत नवनियुक्त उमेदवारांचे मनोबल उंचावण्यास मदत झाली.

..अशी आहेत नोकरीची पदे

अनुकंपा तत्त्वावरील गट ३ आणि गट ४ च्या २०२ उमेदवारांना तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या लिपीक-टंकलेखक (गट-३) च्या ८३ उमेदवारांना असे एकूण २८५ जणांना शासकीय नोकरीची नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात येणार आहे. अनुकंपाधारक उमेदवारांमध्ये राज्य शासनाच्या गट - 'क'चे ५९, गट 'ड' चे ६९ (दोन्ही मिळून १२८ उमेदवार), जि. प. ग्रामविकास विभागाच्या वतीने गट-'क'चे २१, गट-'ड'चे २६ (४७ उमेदवार), नगर विकास विभाग, मनपा, नगर परिषद वतीने गट- 'क'चे १२, गट- 'ड'चे १५ (२७ उमेदवार) असे २०२ अनुकंपाधारक तर सरळ सेवा भरतीद्वारे लिपीक - टंकलेखकपदी नियुक्ती ८३ उमेदवार अशा एकूण २८५ जणांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur: 285 Candidates to Finally Get Government Jobs!

Web Summary : 285 candidates in Chandrapur, including dependents and direct recruits, will receive government job appointment letters. The initiative addresses long-pending compassionate appointment issues, with letters presented by Minister Ashok Uike. The district administration facilitated the process, offering guidance to the new recruits.
टॅग्स :GovernmentसरकारAshok Uikeअशोक उइके